*निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला नवनाथ आश्रम परिसर*

*निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला नवनाथ आश्रम परिसर*

मौदा प्रतिनिधि – संजय गीरडे

मौदा- सावनेर पासून अवघ्या 15 की मी अंतरावर नागपूर भोपाळ मार्गावर बेहडा स्टॉप पासून दक्षिणेस 3 की मी अंतरावर उंच टेकडीवर कोलार जलाशयाच्या अगदी काठावर असलेल्या या परिसरात निसर्गाने आपल्या मुक्त हस्ताने सौदर्याची उधळण केली आहे अतिशय दाट वृक्ष वल्लीने नटलेल्या या परिसरात निसर्ग प्रेमींची गर्दी असते विविध प्रकारच्या औषधी वनस्पती रान फळे फुलेली फुले घनदाट झाडी विविध पक्षी या परिसरात आहे
आणि या निसर्गरम्य परिसरात 1993 ला आश्रमाची स्थापना करण्यात आली आणि मागील 30 वर्षीच्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आज या परिसरात भव्ये नवनाथ मंदिर दत्त मंदिर गजानन मंदिर हनुमान मंदिर स्थापन करण्यात आले वड उंबर आणि पिंपळ असे तीन वृक्ष एकाच जागी असल्यामुळे अनेक भाविक मंडळी या वृक्षाखाली विविध धार्मिक ग्रंथाचे पारायण करण्यासाठी येत असतात या वृक्षाखाली केलेले पारायण फलदायी असते अशी भाविकांची श्रद्धा आहे दरवर्षी या आश्रमात दत्त जयेंती वरूथनी एकादशी महाशिवरात्री गोरक्षनाथ जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते त्याच प्रमाणे आश्रमतर्फेदरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात शेतकरी आणि विद्य्रथ्याकरिता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येते परंतु टेलनगखेडी ते आश्रम हा एक किलोमीटर रस्ता अतिशय खराब असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आश्रमात येणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो ही बाब लक्षात घेऊन शासनाने हा एक की मी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आश्रमाचे वेवस्थापक कृष्णराव गिरडे गावचे सरपंच रंजना झोटिंग उपसरपंच विनोद हिवरकर प्रवीण गिरडे वामन झोटिंग यांनी केली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …