*हाथरस अत्याचाराचा विरोधात SFI चे रामटेक येथे निदर्शने* *निष्पक्ष तपासणी करून गुन्हेगारांना अटक करा*

*हाथरस अत्याचाराचा विरोधात SFI चे रामटेक येथे निदर्शने*


*निष्पक्ष तपासणी करून गुन्हेगारांना अटक करा*

रामटेक प्रतिनिधी :-पंकज चौधरी

रामटेक- स्टुडेंटस फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) नी हाथरस येथे घडलेल्या अमानवीय अत्याचाराचा घटनेचा व उत्तर प्रदेश येथील शासनाच्या भूमिकेच्या विरोधात रामटेक येथील गांधी चौकात दुपारी 1 वाजता, शुक्रवारी 9 ऑक्टोबर रोजी निदर्शने केली. कोविड च्या साथीमुळे निदर्शनात 10 जणांचीच मर्यादा ठरविण्यात आली होती. शारीरिक अंतर ठेवण्याबरोबरच कोरोना साथीचे सर्व नियम पाळूनच हे विरोध निदर्शने कऱण्यात आली. देशात वाढत जाणारे महिलांवरील अत्याचार ही चिंतेची व निषेधाची बाब आहेच पण खासकरून उत्तर प्रदेश येथील होणारे अत्याचारात शासनाचीच खुलेआम आरोपीना पाठीशी घालण्याची भूमिका न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे, असे एस एफ आई चे राज्य समिती सदस्य अमित हटवार यावेळी म्हणाले.

याच घटनेचा निषेध करताना एस एफ आई चे अध्यक्ष संदेश रामटेके यांनी या प्रकरणाचे विविध पैलू उलगडून सांगितले. उत्तर प्रदेशातील दलित समाजाकडे मालकीच्या शेतजमिनी अत्यल्प प्रमाणात असल्याने त्यांना शेतमजुरी करताना जमीनदारांचे सोसावे लागणारे वर्चस्व, जमीनदार लोकांमध्ये उच्चवर्णीय असल्याने दलितांवर सततचा सामाजिक अन्याय , पोलीस प्रशासन व राज्य सरकारचे जमीनदारान प्रति असणारी बांधिलकी, पोलिसांमध्ये असणारी जातीयवादाची आणि पितृसत्ताकतेची मानसिकता यामुळे अशा घटनांचा तपास प्रकरणी होणारा भेदभाव हे सर्व पैलू हाथरस तसेच बलरामपूर, आजमगढ, बुलदंशहर येथील घटनांतून अधोरेखित होते. दुर्दैवाने सरकारने संविधानाचे पालन करण्याऐवजी अश्या घटनांमधून जातीवादी दृष्टिकोन अवलंबल्याने अश्या जातीवादी प्रवृत्ती बळावत चाललेल्या आहेत. तेव्हा याचा लढा दलितांचे आर्थिक सक्षमीकरण व सामाजिक अन्यायाविरोधात लढा या दोन बाजूने करावा लागेल.

या समग्र प्रकरणाची निष्पक्ष तपासणी होऊन पीडिताला न्याय मिळावा, यात समाविष्ट असलेला प्रत्येकावर कार्यवाही व्हावी ही मागणी यावेळेस करण्यात आली. यावेळी संघर्ष हटवार, सागर वाहने, प्रीतम वासनिक, सुरज डुंडे, राम येलके आदि उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …