*शीवा- एलकापार याथे वीज कोसळून तीन महिला ठार,तर दोन गंभीर !*
*शेतात कापूस वेचायला गेल्या होत्या महिला*
कोंढाळी प्रतिनिधी – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – सांयकाळी 5-30 वाजताच्या दरम्यान अचानक मेघ गर्जने सह जोरदार विजेचा कडकडाट अन् तिन मजूरांचा मृत्यू तर दो गंभीर !
11आक्टोबर चे सायंकाळी अचानक पाऊस सुरू झाला यात येथून 10 की मी अंतरावरील शिवा सांवगा येथील ऐलकापार शिवारात श्रावण इंगळे यांच्या शेतात कापूस वेचायला गेलेल्या महिला संध्याकाळी घरी येणार तेवढ्यात सायंकाळी 6 वाजता पावसाने विजेसह हजेरी लावली असता मजूर महिला शेताच्या बांधावरील झाडाखाली आसर्याला गेल्या तेवढ्यात जोरदार वीज कळकळात पडली असता झाडाखाली बसलेल्या महिला गंभीर बेशुद्ध पडल्या असता शेत मालक श्रवण इंगळे धावत गावात आला व गावातून काही युवकासह मोटार जीप घेऊन शेतात गेले व शेतातून सर्व बेशुद्ध मजूर महिलांना उपचाराकरिता लतामंगेशकर हॉस्पिटल दिगडोह हिंगणा येथे नेण्यात आले उपचार दरम्यान त्यातील अर्चना उमेश तातोंडे 36, शारदा दिलिप उईके,35,संगीता गजानन मुंगभाते ,35 रा शिवा याचा मृत्यू झाला तर दोन महिला सत्यभामा श्रावण इंगळे,36 पचफुला गजानन आसोले 60 रा शिवा ह्या गंभीर जखमी असून बेशुद्ध आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे घटनेची माहिती कोंढाळी ठाणेदार शयाम गव्हाणे यांना भ्रमण धवनी वरून पोलीस पाटील शिवा भूषण दत्तू पनासे व संजय नागपुरे यांनी दिली असता ठाणेदार गव्हाणेसह पोलीस उपनिरीक्षक राम ढगे सह किशोर लोही घटना स्थळी शिवा येथे गेले असता बेशुद्ध महिलांना लतामंगेशकर दिगडोह येथे उपचाराकरिता नेण्यात आले होते दिवसभर शेतात काम करून घरी येणार परंतु एवढ्यात काळाने घाला घालून तीन महिला मृत्यू तर दोन गंभीर झालेंच्या बातमीने गावात शोक कळा पसरली आहे .