*मौदा तालुक्यातील धानला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करा किसान अधिकार मंच चे धरणे आनदोलन*
विशेष प्रतिनिधि
मौदा – तालुक्यातील मौजा धानला येथे जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकाम हे दिनांक ०५/०२/२०१६ ला सुरू होऊन काम पूर्ण करण्याचा कालावधी हा २४ महीने व दोष निवारण कालावधी २४ महीने असा असून सुद्धा आज ही सर्व कालावधी संपून जवळपास एक ते दीड वर्षापासून बनून तयार आहे. या इमारतीच्या बांधकामाची किंमत ही 5,45,39,724 रुपये एवढी आहे. पण अध्यापही ही नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत सुरू झालेली नाही व करोना ही जागतिक महाभयंकार बिमारी देशातील प्रत्येक ठिकाणा पर्यन्त येऊन पोहचली आहे. मौदा तालुक्यात सुद्धा आज पर्यन्त ६०० च्या जवळपास या महाभयंकर बिमारीमुळे ग्रस्त आहेत तर १७ जणांचे मृत्यू झालेले आहेत. ही बिमारी दिवसेंदिवस तालुक्यात वाढत चालेली आहे. तरी सुद्धा ही आरोग्य इमारत धूळ खात उभी असणे ही अत्यंत निंदनीय व लाजिरवाणी बाब आहे. धानला गावाच्या सह्भोवताल जवळपास २५ गावे येतात. आता तर शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे, मग शेतकार्यानी व शेतमाजुरांनी आपला इलाज करायला कुठे जावे? सर्विकडे करोना ही बिमारी पसरली असल्या कारणाने कुणीही तालुका किंवा जिल्हा तसेच इतर शहरांच्या ठिकाणी जायला भितात, पण ही गावात गावलगत असलेली करोडो रुपयाची इमारत कोणत्या कामाची? आपत्कालीन तसेच रात्री बे रात्री जनसामान्य, शेतकरी-शेतमजूर यांनी कुठे जावे कुठे आपला इलाज करावा? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहे
ही इमारत सुरू व्हावी या करिता राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. आरोग्य मंत्री याना ०९/०९/२०२० ला भेटून चर्चा करून सर्व माहिती दिली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुद्धा आम्ही हे सर्व प्रकरण कळलं आहे. सोबतच मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हा आरोग्य अधिकारी ही इमारत तात्काळ सुरू करण्याचे आदेश हे एक महिन्या आधी येऊन सुद्धा ते कोणत्याही प्रकारची हालचाल नाही करत आहेत. व त्यांना विचारणा केली असता ते उडवा उडवीचे उत्तरे देतात. त्यामुळे आम्ही हे आज एकदिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत. जर आता शासनाने हे इमारत कधी सुरू होणार हे आम्हाला लेखी हमी दिली नाही. तर आम्ही इमारत सुरू होई पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करू. असा इशारा किसान अधिकार मंच चे अधेक्ष राम वाडीभस्मे यांनी दिला आहे.
राज्य आरोग्य विभागात 29 हजारा पेक्षाही जास्त पदे रिक्त असताना ठेकेदारी पदभरती का.? हो आहे. याच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करत आहोत. जर का हा प्रकार इथे सुद्धा घडला तर आम्ही याचा निषेध करत जो पर्यंत इथे शासन द्वारे नियमित कायमस्वरूपी पदभरती केली जाणार नाही तो पर्यंत हे आरोग्य इमारत बंद ठेवत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
सदर मागणीचे निवेदन हे तालुका आरोग्य अधिकारी मा. रुपेश नारनवरे यांना सोपविण्यात आले राम वाडीभष्मे – मुख्यसंयोजक किसान अधिकार मंच, शेखर घाटोळे, राजेश राजगिरे, दिनेश ठोंबरे, चेतन मेश्राम, तुषार किरपान, अविरत तिरबुडे, सुरज डहाके, राहुल कुंभारे, ईश्वर सावरकर, सुखदेव पत्रे, आकाश तिरबुडे, गौतम मेश्राम, श्याम लिचडे, सचिन वैद्ये, चंदू केकतपुरे, रोशन ठोंबरे, दिपक सावरकर, सौरभ वैद्ये, मयूर सावरकर, विक्की पत्रे, निकेश वंजारी, अजय राऊत, भास्कर पत्रे, किरण धांडे, आशिष वैद्ये, कामेश पत्रे, योगेश तिरबुडे, देवानंद तिरबुडे, अश्विन तांबुलकर, संजय वंजारी आणि समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते