*पेंच टायगर रिसोर्टमधे चालु असलेल्या जुगार अड्डयावर देवलापार पोलीसांची धाड*
*सात आरोपींनासह १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त*
देवलापार प्रतिनिधि -पुरुषोत्तम डडमल
देवलापार :- कोरोना काळात परिसरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवलापार पोलीस प्रयत्नशिल असतांनाच याची पर्वा न करता काहि लोक बेकायदेशिर कृत्य करतात त्यांचेवर आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस ११ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजताच्या दरम्यान देवलापारचे ठाणेदार प्रविण बोरकुटे हे खाजगी वाहनाने पोलीस स्टाफसह पट्रोलिंग करीत असताना खबरीलालद्वारेे गुप्त माहिती मिळाली की, पेंच टायगर रिझर्व रिसोर्ट येथे जुगार चालु आहे.ठाणेदार पंचासमक्ष पेंच टायगर रिझर्व रिसोर्ट येथे गेले असता रिसोर्टचे रुम क्र .४ चे आत आरोपी हे घोळका करून मधोमध बावण तासपत्यावर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळत असताना पोलिसांना आढळून आले.
यावेळी घटनास्थळावर असलेल्याना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नाव १ ) वेदकुमार दौलतराव मोगल( २७ )सर्व रा.अयाझरी खवासा त. कुरई जि.शिवनी २ ) अनिकुमार परसराम उत्तमणी( ३१ ) रा.करी मध्यप्रदेश ३ ) भिमराव संतोष पिटेकर ( ४०) रा.टाकळघाट जि. नागपुर ४ ) संजय मुखलाल परिहार( २५ )रा.कटंगी वार्ड क ४ जि. बालाघाट मध्यप्रदेश ५ ) इमराण कैफुल वरा खान( ३४) रा . दोभारसी कॉलनी कुरई व अन्य दोघे असे एकूण सात आरोपींना पोलिसांनी अटक केली.यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन नगदी ८,४५० रुपये. ७ विविध कंपनीचे अॅन्ड्राईड आणि साधे मोबाईल किंमत ९२ हजार रुपये तसेच झायलो महिंद्र कंपनीची गाडी क्रमांक सी जी ०४/ डी एम ५३०० किंमत ५लाख रुपये, स्विफट डिझायर गाडी क्रमांक डी एल ०२/ सी ए एस ९६३१ किंमत ६लाख५०हजार रुपये , स्विफट मारूती एम एच ३१/ इ ए ८७४४ किंमत ४लाख५०हजार रुपये असा एकुण १७ लाख ४५० चा मुद्देमाल घटनास्थळावर मिळुन आल्याने जप्ती पंचनाम्याप्रमाणे पंचासमक्ष जप्त करण्यत आला . आरोपीचे कृत्य हे जुगार कायदयाअन्वये गुन्हा असल्याने त्यांच्यावर पोलीस स्टेशन देवलापार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग यांचे मार्गदर्शनाखाली देवलापारचे ठाणेदार प्रविण बोरकुटे, पोउपनि केशव पुंजरवाड , परि मपोउपनि एल.एस.घोडके, राकेश नलगुंडवार , मुन्ना पांडे , गजानन कविराजवार, गजानन जाधव,सचिन डायलकर यांनी पार पाडली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि केशव पुंजरवाड हे करीत आहे.