*प्रेम विवाहाचा दारुण अंत* *प्रेमीका पत्नीनेच सुपारी देऊण पतीला पाठवले यम सदनी* *केळवद ठाण्या अंतर्गत नरसाळा हत्येचा लागला छडा़*

*प्रेम विवाहाचा दारुण अंत*

*प्रेमीका पत्नीनेच सुपारी देऊण पतीला पाठवले यम सदनी*

*केळवद ठाण्या अंतर्गत नरसाळा हत्येचा लागला छडा़*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

सावनेरः कमी वयात जडलेले प्रेम त्यातून जीवनभर साथ देण्याची वचनबध्दता व जिवनाचा गाडा़ खेचतांना येणाऱ्या अडीअडचणी यातुनच प्रेमी पतीच्या जाचाला त्रासुन पत्नीनेच सुपारी देऊन पतीला यम सदनी पाठविण्याची दुर्दैवी घटनेतून नरसाळा शिवारात मिळालेल्या अज्ञात शवाच्या तपासातून निष्पन्नास आले.

आई वडिलांनी दिलेले स्वातंत्र अश्यातूनच मुला मुलींचे आकर्षण व सोबत जीवन जगण्याची स्वप्ने, व लग्नापूर्वी चंद्र तारे तोडून आणण्याच्या शपता खाणारे प्रेमवीर जेंव्हा जिवन जगण्याच्या संघर्षात पडतात व संसाराचा गाडा खेचतांना उदभवणार्या अडीअडचणी येतात तेंव्हा एकदुस-याला समजून घेण्याची क्षिन क्षमता असल्याने ते एकदुस-यामधीलच उणीवा शोधू लागतात आणि येथूनच सूरू होतो तिरस्कार व त्याचा अंत अती दुखःद असतो.

असाच दुर्दैवी प्रकार वरूड येथील मृतक- जयदिप साहेबराव लोखंडे वय 39 वर्ष हल्ली रहाणार खेडकर ले आउट सावनेर व देवका उर्फ कविता जयदिप लोखंडे वय 37 वर्ष रा.खेडकर ले आउट सावनेर, या दोन प्रेमी युगुलांनी प्रेम विवाह करुण घरदार सोडून घरच्यांच्या संमती शिवाय लग्न केल्याने पुढील आयुष्यात करिता सावनेरला आले.व पतीने एक छोटेसे हाँटेल टाकून उदरनिर्वाहाची तात्पुरती सोय केली परंतू हे काम जास्त दिवस चालू शकले नाही. यानंतर मृतक जयदीप हा मिस्त्री काम करु लागला व त्याला तेथे दारूचे व्यसन लागल्याने तो कामात नियमित नव्हता. त्यामुळे घर चालविण्यास अडचणी यायच्या.व पती पत्नीन तु तच मै मै वाढु लागली व मृतक आपल्या पत्नीला नेहमी मारहाण करायचा अश्यात त्यांच्या संसाराचे 15 वर्ष लोटले या काळात जयदिप व कविताला 3 मुली झाल्या मोठी मुलगी 10 वी ला, मधली 8 वीला तर सर्वात लहान ही 10 वर्षाची आहे.

पती पत्नीतीत पैश्याच्या आभावी रोजच्यारोज खटके उडू लागले व जयदिप आपल्या पत्नीस मारण्याचा प्रकार थांबवत नव्हता अखेर मार खावून त्रासलेल्या पत्नीने पतीचा काटा काढण्याचा विचार केला.

त्याकरिता घरा शेजारील असलेला चंदन नत्थु दियेवार वय 28 वर्ष रा. खेडकर ले आउट सावनेर यांस पतीचा गेम करण्यासाठी माणूस शोधण्यास सांगितले.

यावर चंदनने महाराष्ट्राच्या सिमेलागतच्या मध्यप्रदेश छिंदवाडा येथे सुनिल जयराम मालविय वय 26 वर्ष या गुन्हेगार प्रवु्त्तीच्या इसमाला सावनेेरात बोलावून मृतकाच्या पत्नीसोबत भेंट घालवून दिली. यात तीने पतीचा गेम करण्यासाठी 50 हजार देण्याचा सौदा तय झाला.

दि. 8 आॅक्टोबर रोजी चंदन दियेवार व सुनिल मालविय यांनी मिळुन केळवद येथुन भाजी कापण्याचा चाकू खरेदी केला. दि. 9 आॅक्टोबर 2020 रोजी आरोपी चंदन दियेवार व त्याचा मित्र सुनिल मालविक यांनी जयदिप लोखंडे याला माझा वाढदिवस असल्याचे सांगुन पार्टी करण्यासाठी चाल असे म्हणुन त्याला आरोपी चंदन दियेवार याची मोपेड गाडी क्र. एम.एच 40 बी.डब्लु 7565 वर बसुन केळवद नरसाळा शिवारात आणले. दि. आॅक्टोबर चे रात्री 11ः00 ते 11ः30 वा. दरम्यान सुनिल मालविय व चंदन दियेवार यांनी जयदिप लोखंडे याचा चाकुने गळा कापुन ठार मारले.व पळ काढला.

आरोपी चंदन नत्यूजी दियेवार व मृतकाची पत्नी कविता उर्फ देवका जयदिप लोखंडे वय 37 वर्ष रा. खेडकर ले आउट सावनेर हिला केळवद पोलिसांनी अटक केली असून आरोपी सूनील मालविय याचा तपास केळवद पोलिस अधिकारी सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …