*आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ नसणारे जनतेच्या समस्या काय जाणणार– सुनील केदार*
*मध्यप्रदेशातील निवडणुकीत झंझावात प्रचाराला सुरुवात*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
ग्वालियर – काँग्रेसी विचारधाराच या देशाला तारक आहे. याच विचारधारेला अनुसरून या देशाला स्वातंत्र्य मिळाले. याच विचाराधारेमुळे देशात नवचैतन्य निर्माण झाले. याच विचारधारेला अनुसारल्यामुळे काही लोकांना सत्ता मिळाली परंतु जे लोक आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ नाही ते जनतेच्या समस्यांवर काय निराकरण करणार असा आरोप महाराष्ट्र राज्याचे मंत्री व मध्यप्रदेश पोटनिवडणुकीचे समन्वयक सुनील केदार यांनी केला.
मध्यप्रदेशच्या जनतेनी काँग्रेसी विचारधारेला पसंती देत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्तेत बसविले. शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्ग यांच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री श्री कमलनाथ यांनी उत्तम निर्णय सुद्धा घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन दिलासा दिला.
परंतु काही लोकांनी पक्षा सोबत विश्वासघात करत काँग्रेसची सत्ता पायउतार करण्याच्या घात केला. एकेकाळी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारे व विचारधारा पाळणारे अचानक सत्ते करिता विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून काँग्रेसला संपविण्याची भाषा करू लागले व विश्वासघात करून सत्तेत आले. अश्या लोकांना मध्यप्रेशतील जनता त्यांची योग्य जागा दाखवून पुन्हा काँग्रेसला सत्तेत आणतील असा विश्वास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.
यावेळी संपूर्ण ग्वालीयर व मुरैना जिल्ह्यातील प्रचाराचा झंझावात सुनील केदार यांनी लावला आहे. जमिनी स्तरावरील काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन आपण ग्वालीयर या गड जिकणारच असा विश्वास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.