*कोलंबिया हाँस्पिटल वर तत्काळ कारवाई करा*
*भाजप युवा मोर्च्याची मागणी*
नागपुर प्रतिनिधि पवन किरापाने
नागपुर- भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरद्वारे आज मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांना कोलंबिया हॉस्पिटलच्या भ्रष्ट कारभाराबाबत निवेदन देण्यात आले.
या हॉस्पिटलमध्ये नुकताच एक अनुचित प्रकार घडला 7/10/2020 भारतीय जनता युवा मोर्चाच्या वॉररूम मध्ये रोहित हिमते यांना एका अज्ञात इसमाकडून फोन आला असता कोलंबिया हॉस्पिटलमध्ये त्याची आई भरती होती अशी माहिती त्यांच्या मार्फत देण्यात आली. त्या अज्ञात इसमाचे नाव कपिल जुमडे आहे. कपिलची आई श्रीमती अंजिरा जुमडे ह्यांना दिनांक ०९-१०-२०२० रोजी दवाख्यान्यातून सुट्टी मिळणार होती, मात्र जेव्हा त्यांना बिल भरायला सांगितले तेव्हा एकूण ६०,००० रुपये त्यांनी ऍडव्हान्स भरले होते आणि एकूण उर्वरित १,८०,१२० भरायला सांगण्यात आले. त्यांनी जेव्हा विचारपूस केली असता त्याच्या हातात असे बिल देण्यात आले की ज्याच्या मध्ये ६ दिवसाचे अतिदक्षता विभागचे (I .C .U.) २५ हजार रुपये रोज या प्रमाणे बिल आकारण्यात आले होते. जेव्हा त्यांनी लेखापरीक्षक चौकशी केली आणि युवा मोर्चाच्या वॉर रूमला संपर्क केला तेव्हा रोहित हिमते यांनी डॉक्टर्स सोबत संपर्क केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा १,२०,००० ऐवजी ७८,००० हजार भरा आणि नंतर आमच्या सोबत संपर्क केला नंतर केवळ ४०,००० रुपये भरा असे सांगण्यात आले.
सदर घटनेनंतर आमचा संपूर्ण चमू कोलंबिया हॉस्पिटलला गेले आणि जेव्हा त्यांनी बिलाबाबत हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारला तेव्हा त्यांनी संपूर्ण बिल हे ४०,००० आणले आणि अगोदर जे ६०,००० रुपये ऍडव्हान्स भरले होते त्यातूनही २०,००० रुपये त्यांना वापस देण्यात आले.
या संबंधित मनपा आयुक्तांनी सक्त कारवाही कोलंबिया हॉस्पिटलवर करावी ही मागणी आज निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांना करण्यात आली. या सोबतच मनपाचे जे लेखापरीक्षक ठरवलेले आहेत त्यांच्या नाव आणि नंबर्स आपण जाहीर करावे जेणेकरून प्रत्येक सामान्य रुग्ण हा लेखापरीक्षकांच्या माध्यमातून स्वतः चे हॉस्पिटलद्वारे देण्यात आलेले बिल तपासुन घेऊ शकतील अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली. त्यावर सकारात्मकतेने योग्य तपास करून उचित कारवाही करतील असे आश्वासन आयुक्तांतर्फे देण्यात आले.
आजचे निवेदन भाजयुमो प्रदेश सरचिटणीस शिवानी दाणी वखरे व भाजयुमो प्रदेश कार्यकारीणी सदस्य राहुल खंगार यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, विध्यार्थी आघाडी संयोजक रोहित हिमते व दक्षिण-पश्चिम नागपुरातून सारंग कदम यांच्या सह देवा डेहनकर, हितेश घुई, हर्षल तिजरे, राकेश भोयर, यश सातपुते, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, राकेश पटले, आशुतोष भगत,अक्षय दाणी उपस्थित होते. दक्षिण नागपुरात वैभव चौधरी यांच्या सह नेहल खनोरकर, पियुष बोईनवार, अमर धरमारे, नितीन शिमले, आकाश भेदे, अमित बाराई , अंगत जरुळकर, योगेश मधुमटके, मयुर इंगोले उपस्थित होते. पूर्व नागपुरातून सचिन करारे यांच्या सह मंगेश धार्मिक, आशीश मैहर, एजाज शेख, गोविंदा काटेकर, सचिन ठाकरे, मौसम पांडे, इंद्रजीत वासनिक, आसिफ पठान उपस्थित होते. मध्य नागपुरातून दिपांशु लिंगायत यांच्या सह सचिन सावरकर,अंकुर थेरे,रितेश रहाटे, अथर्व त्रिवेदी, अक्षय ठवकर, बादल राऊत उपस्थित होते. पश्चिम नागपूरातुन कमलेश पांडे यांच्या सह योगेश पाचपोर, बबलू बक्सरिया, राजा मोहिते, संदीपन शुक्ला, प्रतीश पाटिल, स्वपनिल खडकी, रोहित त्रिवेदी, प्रतीक बनदीरके, संदीप सुपटकर, ईशान जैन, आयुष महल्ले, अक्षय शर्मा, कमलेश शर्मा उपस्थित होते. उत्तर नागपुरातून आलोक पांडे यांच्या सह प्रकाश मालवीय, जय सजवानी, सुमित साहू, ऋषभ मोडघरे, विष्णू तिवारी, पवन शाहू, मोहित यादव, रूपेश ठाकरे, जतिन मोटवानी, शुभम साहू, प्राणिल कृपाने, लकी समुद्रे, बलराम मनुजा सह गौरव हरड़े, पवन महाकाळकर, अमित दहासहस्त्र, सागर बनोदे, पवन बालपांडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.