*राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिनानिमीत्त डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय येथे कार्यक्रम संपन्न*
सावनेर प्रतिनिधि – सूरज सेलकर
सावनेर / नागपुर – ऑक्टोंबर राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिनाचे औचीत्य साधुन डागा स्मृती शासकीय रुग्णालय रक्तपेढीद्वारे सकाळी 10.00 वाजता रक्तदान रॅलीचे मोठे आयोजन करण्यात आले . राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान रॅलीचे उदघाटन डागा स्मृती शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षिका डॉ सिमा पारवेकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . डांगे यांच्या हस्ते करण्यात आले . ” राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिनाचे “ घोषवाक्य Lets donate blood voluntarily and contriubute to the fight against CORONA या घोषवाक्यने रॅलीला सुरुवात झाली . रॅलीत अधिकारी वर्ग तसेच स्वैच्छिक रक्तदाते , परिचारिका वृंद आणि रुग्णालयातील कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला . रॅलीच्या आयोजनानंतर आयोजीत कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा स्लोगन स्पर्धा आणिी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली .
या कार्यक्रमात रक्त संकमण अधिकारी डॉ . संगिता मेहता , डॉ . रविंद्र पांडे हे उपस्थित होते . या प्रसंगी सौ . वर्षा बालपांडे ,नंदा राउत आरती कांबले, रश्मी खंडेलवाल , वंदना बरडे ( परिसेविका ) , सजिवनी सातपुते , अंकिता सोनटक्के , संकेत बरडे , राजेश गील हजर होते . राष्ट्रिय स्वैच्छिक रक्तदान दिवस हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता डागा स्मृती शासकीय रुग्णालयातील व रक्तपेढीतील सर्व कर्मचारीनी अथक परिश्रम घेतले.