*रस्ता ओलांडत असतांना कारच्या धडकेत बिबट जखमी* *कार वन विभागाच्या ताब्यात*

*रस्ता ओलांडत असतांना कारच्या धडकेत बिबट जखमी*

*कार वन विभागाच्या ताब्यात*

देवलापार प्रतिनिधी -पुरुषोत्तम डडमल

देवलापार :-पवनी वन परिक्षेत्र, प्रादेशिकच्या चोरबाहूली उपवनक्षेत्र मोगरा बिटमधून जात असलेल्या नागपूर-जबलपूर महामार्गावरील चोरबाहुली येथे आज १९ऑक्टोबर ला दुपारी ३वाजताच्या दरम्यान नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना पवनी कडून नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कार क्रमांक एमएच ३६ /एच ४८१४ ने बिबट्याला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये बिबट गंभीर जखमी झाला.ड्रायव्हर कारसह घटनास्थळावरून फरार झाला.परंतू कान्द्री येथील आरटीओ चेक पोस्ट वरून सदर कार वनविभागाने जप्त केली.
वनविभागाचे अधिकारी रितेश भोगाडे यांनी तातडीने बिबट जखमी झालेल्या घटनेची माहिती रेस्क्यू टीमला दिली.
संध्याकाळी पाच वाजता दरम्यान रेस्क्यू टीमने जखमी बिबट्याचा शोध घेतला परंतु अंधार पडल्याने शोध मोहीम अर्ध्यावरच थांबविण्यात आली.परंतू बचाव टिम उदयाला पुन्हा जखमी बिबट्याचा शोध घेणार आहे.जखमी बिबट वना लगत असलेल्या गावात जाण्याची दाट शक्यता असल्याने
वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांनी वना लगत असलेल्या गावकर्यांना सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …