*गणपति बाप्पा अपने गांव चले कैसे हमको चैन पडे*
*गणपती विसर्जनास सुरुवात*
सावनेर शहर वार्ताहार-*सुरज सेलकर*
*सावनेरःसंपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा ची स्थापना करूण गणरायाची मोठ्या उत्साहात व श्रध्देनी स्थापना करुण कुणी पाच दिवस,सात दिवस तर कुणी अनंत चतुर्दशी पर्यंत घरो घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पा ची यथाशक्ती पुजा अर्चना करतात तर अनेक सेवाभावी संस्था व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सार्वजनिक स्थानावर मोठ मोठे सुंदर देखावे उभारुण महागणेशाची स्थापना करतात.*
*अनंत चतुर्दशी चे पावन पर्व जवळ येताच भारी मनाने आपल्या गणपती बाप्पा ला “पुढच्या वर्षी लवकर या” चे साकडे घालून नीरोप देण्यात येतो.अनंत चतुर्दशी ला घरगुती गणपती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जनाची एकच गर्दी असते अश्यात सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ पेठपुरा सावनेर येथे विराजमान गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले व कोलार नदीच्या काठावर गणपती बाप्पास शेवटचा नीरोप देण्यात आला.विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या वतीने मीळालेल्या गणेशोत्सव संबंधित सुचनांचे काटेकोर पणे पालन करून बाल गणेशोत्सव मंडळ पेठपुरा यांनी आदर्श नोंदवत गर्दी च्या एक दिवस पुर्वीच शांततेत गणेश विसर्जन केल्याने पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सहकारींचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले तर विसर्जन मीरवणूकीत बाबूळगाव येथील बँड पथकाने आपल्या वाद्य कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे विशेष.*
*विसर्जना करिता नगर प्रशासन व पोलीस प्रशासन सज्ज*
*गणेश विसर्जन म्हटले की नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाची जवाबदारी वाढने अपेक्षित आहेच वाहतूक व्यवसाय, विसर्जनाचे स्थान,नदीच्या घाटावरील रस्ते,विद्यूत व्यवस्था,नदीचे पर्यावरण राखण्यासाठी निर्माल्य संकलन स्थळे,व कु्त्रीम हौद निर्मिती,विसर्जन दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडु नयेक्षकरीता बचाव दल अश्या विविध व्यवस्थांना अंतीम रुप देऊन कोलार नदीच्या शीव मंदीर व मुरलीधर मंदीर तीरावर व्यवस्था करण्यात आली असुन नागरिकांनी निर्माल्य व गणेश प्रतीमा कु्त्रीम हौदात करण्याची विनंती मुख्याधिकारी व कर्मचारी नगर परिषद सावनेर यांनी केली असुन गणेश विसर्जन मीरवणूकी दरम्यान वाहतूक व्यवस्था व रहदारीला अडथडा़ निर्माण होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषण होणार नाही, मीरवणूकी दरम्यान श्री च्या मुर्तीचे विशेषतेने लक्ष देण्याची विनंती पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांना तसेच विसर्जन मीरवणूक दरम्यान समाजसेवी संस्था व नागरिकांनी सुव्यवस्था सांभाळन्यास पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे निवेदन केले आहे.*