*पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातूनच विकास कामे शक्य*
*सावनेर,कळमेश्वर तहसील कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकरी लाभार्थ्यांना धनादेश वाटप करताना दुग्ध विकास ,पशुसंवर्धन, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
सावनेर – मार्च महिन्यापासून कोरोणामुळे संपूर्ण देश हैराण झाला असून कोरोणावर नियंत्रण मिळवण्यात सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून यश प्राप्त झाले आहे. कोरोनाचे संकट डोक्यावर असताना परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या मुसळधार पावसात शेतकऱ्यांच्या शेतीचे, घराचे आणि गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या भागाचा प्रतिनिधी म्हणून शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले त्याला यशही आले संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये सावनेर आणि कळमेश्वर तालुक्याला नुकसानीबाबत चे सर्वात जास्त पैसे मिळाले आहे*
शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंना लवकरात लवकर मिळावा हीच प्रशासन व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे . कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय महत्त्वाचा आहे . कोविडच्या काळातही सावनेर तालुक्यात स्थानिक पदाधिकारी व विविध विभागातील प्रशासन यांच्या समन्वयामुळे विविध योजनांचा लाभ ग्रामीण स्तरावरील गरजू व्यक्तींच्या घराघरात पोहोचत असल्याचे प्रतिपादन क्रीडा , पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी केले .
तहसील कार्यालयात महसूल विभाग व पंचायत समितीच्या वतीने शासनाच्या विविध योजनेतील गरजू लाभार्थ्यांना सहानुग्रह अनुदान व वस्तूंचे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते . मंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे , पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे , उपसभापती प्रकाश पराते , उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे , तहसीलदार प्रताप वाघमारे , गटविकास अधिकारी अनिल नागणे , तालुका कृषी अधिकारी आश्विनी कोरे , नायब तहसीलदार चैताली दराडे , ज्योती शिरस्कर , प्रकाश खापरे , गोविंदा ठाकरे , ममता केसरे उपस्थित होते . यावेळी अतिवृष्टीमुळे व पूरग्रस्त नागरिकांच्या झालेल्या घरांची पडझड , जनावरांचे नुकसान व शेत पिकांचे नुकसानीसाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत काही पात्र लाभार्थ्यांना 20 हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले . पंचायत समितीमार्फत खनिज निधीअंतर्गत ग्रामीण भागातील काही गरजू दिव्यांगांना वाहन वाटप तसेच जिल्हा परिषद शेष फंडा अंतर्गत मनोरमा महाजन या महिलेला झेरॉक्स मशीन देण्यात आली .
*कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागात पैश्याची चणचण झाली आहे अश्या परिस्थितीत शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने काम केल्यास चांगले विकास साधू शकतो*
*निवडणुकीमध्ये लोकांनी जशी भरभरून मते दिली त्याच प्रमाणात विकास झाल्यास मतदारांचे समाधान होईल असे प्रतिपादन राज्याचे मंत्री सुनील केदार यांनी कळमेश्वर तहसील कार्यालयात नुकसानग्रस्त शेतकरी लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी केले यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी प्रशासनाने कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांची आणि नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा याबाबतची माहिती मंत्रिमहोदयांना दिली कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती श्रावण दादा भिंगारे, उपसभापती जयश्री वाळके, खरेदी-विक्री अध्यक्ष बाबाराव कोढे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाबाराव पाटील, मोहपा ऍग्रो संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पन्नासे,जि प सदस्य देवानंद कोहळे, महेंद्र डोंगरे, पिंकी ताई कौरती,पंचायत समिती सदस्य वंदना बोधाने, मालती वसु, प्रभाकर भोसले, विजय भांगे माजी सभापती वैभव घोंगे उपसभापती नरेंद्र पालटकर , सरपंच मंगेश गोतमारे,किशोर मोहोड, माजी उपसरपंच हेमराज पोहनकर, यांच्यासह तालुक्यातील शेतकरी लाभार्थी विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार तहसीलदार सचिन यादव यांनी मानले.*