*हिंन्दू मुस्लिम एकतेचे प्रतीक एकच मंगलमूर्ति*
*बाल गणेशोत्सव मंडळ चिचपुरा सावनेर चा उत्सफुर्त उपक्रम*
*उपसंपादक –
दिलीप घोरमारे (सावनेर)
*सावनेर येथील चिचपुरा शाही मश्जीद समोर मागील वीस वर्षा पासून हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून श्री गणेशाची स्थापना केल्या जात आहे. दोन वेळच्या गणपतीची आरती व पाच वेळची नमाज या वेळी दोन्ही समाज बांधव मोठ्या श्रद्धेनी दोन्हीही समाजाचे पावीत्र जपून करत आहे. गणेशोत्सवा दरम्यान भक्ती गीतांचा आनंद,भजन, पुजन ,महाप्रसाद ईत्यादी उपक्रमात दोन्ही समाज बांधवाची उपस्थिती हेच या मंडळाचे मोठे वैशिष्ट सदर आयोजनात शाही मश्जीद चे अध्यक्ष महबूब शाह,हपीज़ शाह,इमरान शाह,निजाम भाई,शाहील शाह,रफीक शाह,जितेंद्र खेखारे,प्रकाश गुडधे,आकाश चरपे,सुरेश चरपे,विनोद पारधी,ऋषीकेश नाईक,आकाश अनंतवार,अजय आकुलवार,गंगाधर उंकीकर,विक्रम अंबरते व सहकारी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सजारा करुण हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देत सामाजिक बांधीलकी चा वारसा जपत आहे.*