*अज्ञात वाहनाच्या धडकेत सेवानिवृत्त वायरमन चा मृत्यू*
*कळमेश्वर नागपूर खराब रस्त्याचे पडले बळी*
*मृतक भांगे यांच्या अपघाती मूत्युने कळमेश्वर परिसरात हळहळ*
विशेष प्रतिनिधि
कळमेश्वर – दिनांक 22 ऑक्टोंबर 2020 तालुका प्रतीनीधी
कळमेश्वर नागपूर रस्ता खड्ड्याची चाळणी झाला असून दिवसेंदिवस या रस्त्यावर अपघाताची संख्या वाढून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे दुचाकी आणि चार चाकी चालक खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात एकमेकांना धडकून अपघाताला बळी पडत आहे या खड्डेमय रस्त्याची वारंवार तक्रारी एन एच ए आय च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात येऊनही या रस्त्याची साधी दुरुस्तीही करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून मरणाला सामोरे जावे लागत आहे असाच एक अपघात आज दुपारी दहेगाव शिवारात घडला या अपघातामध्ये दुचाकीचालक सेवानिवृत्त वायरमन ला आपला जीव गमवावा लागला खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात अज्ञात बोलेरो चालकाने त्यांना धडक देऊन जागीच ठार केले चंद्रभान मारुती भांगे वय 70 वर्ष राहणार वार्ड क्रमांक 10 देशमुख लेआउट कळमेश्वर असे मृतक सेवानिवृत्त वायरमन चे नाव आहे हे घटना आज दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता दरम्यान घडली.प्राप्त माहितीनुसार मृतक चंद्रभान यांचा बळी खड्डेमय रस्त्याने गेल्याची चर्चा नागरिकां मध्ये असून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.कळमेश्वर नागपूर मार्गावर मृतक चंद्रभान भांगे हे दुचाकी क्रमांकMH.34 .48 79 ने कळमेश्वर वरुन नागपूर मार्गावर असलेल्या दहेगाव शिवारातील अापल्या शेतात जात असताना मागाहून कळमेश्वर कडून नागपुर कडे भरधाव व निश्काळजीपणे जाणार्या अज्ञात तवेरा कारने दहेगाव शिवारातील शर्मा ढाबा परिसरात जबर धडक दिली धडक देऊन भरधाव वेगात कारचालक घटनास्थळावरुन पळून गेला. अपघातात भांगे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच म्रुत्यु झाला.भांगे यांचा कळमेश्वर परिसरातील नागरीकांशी असलेला मोठा संपर्क व मनमिळावू स्वभावाने त्यांच्या अपघाती म्युत्युने मोठी शोककळा पसरली. कळमेश्वर पोलीसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पसार झालेल्या तवेरा कारचा शोध घेत अाहे
रस्त्याची डागडुजी ताबडतोब करा अन्यथा आंदोलन करू नागरिकांचा आंदोलनाचा इशारा कळमेश्वर नागपूर रस्ता खड्डेमय झाल्याने दररोज अपघातात वाढ झाली आहे सकाळी घरून कामा करिता गेलेला माणूस संध्याकाळी घरी येईल की नाही अशी भिती आता वाहनचालकाच्या कुटुंबियांना सतावू लागली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील खड्डे वाढतच आहे या रस्त्यावरून अति महत्त्वाच्या व्यक्ती मंत्री सतत ये-जा करीत असतात तरीसुद्धा या रस्त्याची डागडुजी होत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे दररोज नागरिकांना रस्त्यात पडून जीव गमवावा लागत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मु ग घेऊन गप्प का आहे असा प्रश्न आहे तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन ताबडतोब रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.