*युॅको बॅक च्या गेट वर वृध्द महिलेचा फसवणुक*
रामटेक प्रतिनिधी – ललित कनोजे
रामटेक – युॅको बॅक रामटेक येथे वृध्द महिलेची रोख रक्कम घेऊन भामट्या युवक पसार.सविस्तर माहीती अशी की रामटेक गांधी चौक लगत वळदळीच्या ठिकाणी असलेल्या युॅको बॅक येथे वृध्द महिला मैनाबाई चंदनबटवे वय ७५ वर्षे रा. विनोबा भावे वार्ड रामटेक ही आज दुपारी बॅकेत श्रावणबाळ योजनेचे मिळत असलेल्या लाभा चे पैसे काढण्याकरीता बॅकतुन आपल्या खात्यातून ५०००/- रुपये काढले व बॅकेच्या मुख्य गेटवर पैसै मोजत असतांना एक अनोळखी युवक पाळत ठेऊन बसलेला वृध्द महीले जवळ आला व मी पैसे मोजुन देतो म्हणून वृध्द महीलेच्या जवळील पैसे घेऊन पसार झाला. सदर घटनेची माहीती बॅक मॅनेजर मिळताच त्यांनी पोलीस स्टेशन ला कळविली.
पोलीस निरिक्षक दिलीप ठाकूर आपल्या सहकांर्यासह घटना स्थळी दाखल होऊन परीसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपी चा शोध करीत आहेत.