*अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग आरोपीस अटक*
*बंजार पथरई येथील घटना*
*आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी*
देवलापार प्रतिनिधी -पुरुषोत्तम डडमल
देवलापार – दि .४ नोव्हेंबर बुधवार रोजी देवलापार परीसरातील फिर्यादी यांनी पो.स्टे.ला येवुन तोंडी रिपोर्ट दिली कि दि .१नोव्हेंबर रोजी आरोपी नामे राजपाल हिरालाल वरखडे (२६ )राहणार बंजार पथरई याने फिर्यादीची पिडीत अल्पवयीन मुलगी वय ०८ वर्ष हि घराबाहेर खेळत असताना तिला खर्रा देण्याचे बहाण्याने घरात बोलावुन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे.देवलापार येथे अप क २१५/२० कलम ३७६ ( अब ) भादवी सह कलम ४,६ पोक्सो अन्वये काल ४ नोव्हेंबरला गुन्हा नोंद करण्यात येवुन घटनेचे गांभीर्य ओळखुन ठाणेदार प्रविण बोरकुटे,सहायक पोउपनि केशव पुंजरवाड सा.व परिपोउपनि लक्ष्मी घोडके हे त्यांचे पोलीस टीमसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले व त्या बाबतची माहीती मा.उप विभागीय पोलीस अधिकारी रामटेक व पोक्सो सेल अधिकारी सपोनि भुते यांना देण्यात आली.
सदर घटने पासुन आरोपी नराधम गावातुन फरार होवुन पारशिवणी येथे आपले नातेवाईकाकडे लपलेला होता.पोलिसांना आरोपी बाबत माहिती मिळताच तात्काळ पो.उप.नि. केशव पुंजरवाड यांचे सह पोलीसाची वेगळी टिम बनवुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे राजपाल हिरालाल वरकडे (२६ ) राहणार बंजार पथरई यास ताब्यात घेवुन तात्काळ अटक करण्यात आली.
सदर आरोपीस आज दि .५ नोव्हेंबर गुरुवारला माननीय न्यायाधीश यांचे समोर पेश करण्यात आले असुन त्यास ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सदर गुन्हयाचा पुढील तपास हा उप विभागीय पोलीस अधिकारी नयन आलुरकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोक्सो सेल अधिकारी सपोनि भुते पो.स्टे. रामटेक या करत आहेत.