*घरकुल योजनेचे देयके त्वरित द्या:वैभव डहाणे ,मनसे तालुकाध्यक्ष यांची मागणी*
*अन्यता मनसे स्टाईल ने आंदोलन करू*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – शहरातील गरजु व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जाते.शासनाची या योजनेबाबत सकारात्मक भूमिका आहे .सर्वांचे हक्काचे घर असावे कोणीही उघड्यावर राहू नये यासाठी ही योजना आहे.परंतु प्राप्त झालेल्या तक्रारी वरून लक्षात येते की वरोरा नगर परिषद मध्ये घरकुल लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्राची पूर्तता करून देखील कर्मचारी त्यांना हेलपाटे मारायला लावत आहे.म्हणून आज दिनांक 5/11/2020 रोजी मुख्याधिकारी ,नगर परिषद वरोरा यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले .कोरोनाच्या काळात सर्वांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची ची घरे अर्धवट अवस्थेत आहेत त्यांना भाड्याने रहा लागत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड त्यांना भरावा लागत आहे.तरी घरकुल लाभार्थ्यांना त्यांची देयके त्वरित देण्यात यावी अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष वैभव डहाणे यांनी दिला आहे.