*अवैध वाहतुकीमुळे रस्त्याचे हाल बेहाल*
*सामान्य जनतेला करावा लागतो अडचणींचा सामना*
रामटेक प्रतिनिधी :-पंकज चौधरी
रामटेक – गेल्या काही दिवसात कान्द्री ते शितलवाडी मार्गाने होत असलेल्या अवैध वाहतुकीने नव्याने तयार झालेल्या रस्त्याचे बेहाल झालेले दिसून येत आहेत.नागपूर-जबलपूर महामार्गावर कान्द्री जवळ असणाऱ्या चेक पोस्ट वाचविण्यासाठी अनेक मोठमोठे ट्रक कान्द्री शितलवाडी मार्गाने वाहतूक करीत असतात.आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोड वाहून नेल्याने नव्याने तयार केलेल्या रस्त्याचे हाल होतांना निदर्शनास येत आहे .या सर्व प्रकारचा त्रास जनसामान्य माणसांना होतांना दिसून येते याकडे स्थानिक प्रशासनाचे देखील कोणतेही लक्ष दिसून येत नाही.