*आमडी फाटा ते पारशिवनी रस्त्याच्या बांकामात अनियमितेचा आरोप*
*नवनिर्माण सेनेचे यलगार*
*रस्ते बांधकामात दिरंगाई खपवून घेणार नाही –सुनील ठाकरे
पारशिवनी-*आमडी फाटा ते पारशिवनी-सावनेर रोड येथे सुरु असलेल्या पुलाचे आणि सिमेंट रोडच्या कामात होत असलेली दिरंगाई व कामामुळे एकतर्फी सुरु असलेल्या रोड वर वाहतुकीच्या ताणामुळे प्रचंड गड्डेच-गड्डे पडले असून सर्वत्र चिखल,धूळीचे व सिमेंटच्या लोटामुळे होत असलेला सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रासा विषयीच्या निवेदना नंतर राष्ट्रीय महामार्ग विभागा च्या वतीने, के अँड जे प्रोजेक्ट PVT.LTD.चे अधिकारी ,कंत्राटदार चे अधिकारी यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित “रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभागाचे” वतीने उपजिल्हा संघटक सुनील ठाकरे यानी कामाची पाहणी करण्यात आली.*
*सदर ठिकाणाच्या कामाची नियमानुसार अवधी संपली असून कामाची प्रगती बघता अजून किमान ६ ते ८ महिने कामे पुर्णत्वास जाण्यास लागणार आहेत. पाहणी मध्ये कामगारांचे सेफटी काहीच आढळलेली नाही .सर्वत्र नवीन बनविलेला सिमेंट रोडला भेगा पडलेल्या आहेत .सिमेंट रोड च्या खूप अश्या जागी गिट्टी ,रेती निघालेली आढळती आहे .ड्रेनेज चे सवर्त्र काम अत्यंत णिकृत्त दर्जाचे आहे .टाकलेल्या स्ल्याप ला सुद्धा भेगा गेलेल्या पाहणीस मिळतील .सदर ठिकाणच्या अर्धवट ड्रेन च्या कामामुळे शेतकरी बांधवांचा शेतमाल ड्रेन मधून येणारे पाण्यामुळे शेतात खराब होतोय.त्यामुळे त्यांच्या उदर निर्वाहाचा मोठा प्रश्न उदभलंय .सदर अधिकाऱ्यांना विचारणा करता त्यांच्याकडे उत्तर नाही .
प्रस्तावित कामाला होणाऱ्या दिरंगाईला जबाबदार कोण असणार?
त्यांचेवर कोणती नियमानुसार कार्यवाही होणार ?
कामाची एकूण गुणवत्ता काय ?
जागोजागी गड्डेच-गड्डे असल्यामुळे त्याचा वाहनचालकांना होणारा त्रास, गाड्यामुळे होणारे अपघात, धुळीमुळे स्थानिक आणि रहदाऱ्यांच्या स्वास्तावर विपरित परिणाम होतो आहे .अश्या प्रकारच्या अनेक बाबी संबंधिताना त्यांच्या नजरेस उघड करूर दाखविल्या.सदर काम संपूर्ण अनियंत्रित आणि अनिर्बंधित पाहणीत निदर्शनास आलंय.वेळेतच सदर कामात राष्ट्रीय महामार्ग विभागाने दखल देऊन संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर्ती दंडात्मक कार्यवाही न केल्यास सदर काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने बंद करण्यात येईल हे संबंधित पाहणीत असलेल्या अधिकाऱ्यांना खडसावून बजावण्यात आले.*