*कळमेश्वर तालुका क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन कोर्ट चा लोकार्पण सोहळा संपन्न.*
*तालुक्यात क्रीडा सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार.*
*खेळाडूंनी उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन क्रीडा क्षेत्रात यशस्वी व्हावे.*
*शालेय जीवनात एकातरी खेळात प्राविण्य प्राप्त करावे.*
*क्रीडा क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टिकोनाने बघावे.*
*आमदार सुनील केदार यांचे प्रतीपादन*
*कार्यकारी संपादक-योगेश कोरडे
कळमेश्वरः *क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत कळमेश्वर येथील तालुका क्रीडा संकुल मध्ये दिनांक 12 सप्टेंबर ला माननीय आमदार श्री सुनील केदार यांचे हस्ते बॅडमिंटन हॉलमध्ये होवा कोर्टचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार सुनील केदार उपस्थित होते.*
*कळमेश्वर तालुक्यात क्रीडा संस्कृती रुजावी व स्थानिक युवकांनी त्याचा लाभ घेऊन येथून चांगले खेळाडू घडावे अशी आशा व्यक्त करीत, भविष्यात क्रीडा क्षेत्रात नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना दिले.*
*कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विभाताई निंबाळकर माजी सभापती, पंचायत समिती कळमेश्वर, तालुका क्रीडा संकुल समितीचे कार्यकारी अध्यक्ष तसेच तहसीलदार माननीय सचिन यादव, कळमेश्वर नगर परिषदेच्या उपाध्यक्षा माननीय जोत्स्नाताई मंडपे, मुख्याधिकारी श्रीमती स्मिता काळे, जिंदल स्टील कंपनीचे कॉर्डिनेटर शेखर भारद्वाज, त्याचप्रमाणे माननीय श्री वैभव घोंगे, नगरसेवक श्री ललित देशमुख, श्रीमती वनिता भलावी श्रीमती मिनाताई शिरभाते, श्रीमती सिंधुताई धरपाळ, अश्विनी घोंगडी, अरविंद जी रामावत आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.*
*कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी श्री कळंबे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन श्री गजेंद्र शेंडे यांनी केले. कार्यक्रमास क्रीडा क्षेत्रातील मान्यवर खेळाडू त्याचप्रमाणे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*