*स्वच्छ भारत ‘मिशन’ चे वाजले तीनतेरा….!*
*लाभार्थ्यांना घरकुले कधी लाभणार ; प्रश्न ऐरणीवर…?*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेेेड़ – तालुकांतर्गत घोगरा (लोहारी), जुनेवानी गटग्रामपंचायतीत स्वच्छ भारत ‘ ‘मिशन’चे तीनतेरा वाजले असून लाभार्थ्यांना त्यांचे घरकुले कधी लाभणार हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत घरकुले लाभार्थ्यांची यादी माहितीच्या अधिकारान्वये सचिवांना निवेदनांतर्गत मागितली आहे. याप्रसंगी ग्रामस्थ मयुर अढाऊ, मनिष काटोले, शुभम बन्नगरे, विलास काटोले, संदीप काटोले, राजू ताटे, भावेष काटोले प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर ग्रामपंचायतीत वारंवार लोकांची स्वच्छ भारत ‘मिशन’ अभियानांतर्गत मिळणारा लाभ कधी मिळणार शिवाय ग्रामस्थांना मिळणारे घरकुल कधी येणार अशा प्रश्नाने ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांना ग्रासला आहे. ग्रामस्थांचे घरकुलाबाबत विचारले असता, सदर गटग्रामपंचायत मात्र टाळाटाळ करून आपल्या अकार्यक्षमतेचे खापर कोणाचे डोक्यावर फोडणार असा अनुत्तरित प्रश्न टांगणीला टांगला गेल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
जनतेला त्यांचा हक्क मिळावा व त्यांचे समस्यांचे निवारण व्हावे. यासाठी युवकांनी पाऊल उचलले आहे. माहिती अधिकारांतर्गत स्वेच्छालय, शौच खड्डा घरकुल लाभार्थी यादीची मागणी केली आहे. गरीब जनतेला त्यांचे हक्काचे घरकुल व स्वेच्छालय मिळवून देण्याची संकल्पना युवकाँचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे हे उल्लेखनीय !