*सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासना मार्फत संयुक्त क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीमेस प्रारंभ* *दि. ०१ डिसेंबर २०२० ते दि.१६ डिसेंबर२०२० पर्यंत*

*सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासना मार्फत संयुक्त क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीमेस प्रारंभ*

 

*दि. ०१ डिसेंबर २०२० ते दि.१६ डिसेंबर२०२० पर्यंत*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासना मार्फत आपल्या राज्यातील सर्व जनतेची क्षयरोग तसेच कृष्ठरोग या दोन भयंकर आजारांपासून सुरक्षितते साठी
दि. ०१ डिसेंबर २०२० ते दि.१६ डिसेंबर२०२० पर्यंत
संयुक्त क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत असुन तालुका नरखेड प्रा.आ.केंद्र मोवाड अंतर्गत उपकेंद्र खैरगांव येथे आज रोजी सदर मोहीम मा.डॉ.विघांनद गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी नरखेड, मा.डॉ.संजय सोलंकी ,मा.डॉ. प्रविन उमरगेकर वैद्यकीय अधिकारी मोवाड, यांचे प्रमुख उपस्थित
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेचे पुजन स्थानिक ग्रामंपचायत येथे जेष्ट शिक्षक मा.काळे गुरूजी यांचे हस्ते , .दांडगे तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक . .डुकरे तालुका क्षयरोग पर्यवेक्षक,.एस.यु.भकते ग्रामविकास अधिकारी , प्रशांत विरखरे आरोग्य सेवक ,कु.के.एम.श्रीरामे आरोग्य सेविका,आशा,यांचे प्रमुख उपस्थित करण्यात आले.सर्वाच्या घरोघरी या आजाराबाबत तपासणी करण्यात येणार असुन

खालिल लक्षणे

१)दोन आठवड्या पेक्षा जास्त काळ खोकला

२)दोन आठवड्या पेक्षा जास्त काळ ताप

३)वजनात लक्षणीय घट

४)भूक न लागणे

५)मानेवर येणाऱ्या गाठी

हे सर्व क्षयरोग (टी. बी.)चे लक्षण असू शकतात
त्याच प्रमाणे

तसेच कृष्ठरोगाची

१)अंगावरील फिक्कट लाल संवेदना रहित चट्टा.

२)मऊ व चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावरील गाठी.

३)हातापायांमध्ये बधिरता तसेच शारीरिक विकृती
हे सर्व कृष्ठरोगाची लक्षणे असू शकतात.

म्हणूनच सतर्कता बाळगा, मोहिमेदरम्यान आपल्या कडे येणाऱ्या प्रशिक्षित स्वयंसेवकांन कडून तपासणी करून घ्या आणि त्यांना सहकार्य करा.!कारण जर आपण निरोगी तरच आपले कुटुंब निरोगी ||

तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी तपासणी करून घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आव्हान प्रशांत विरखरे आरोग्य सेवक उपकेंद्र खैरगांव प्रा.आ.केद्र मोवाड यांनी या वेळी केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …