*नरखेड ,मोवाड व इतर गावातील शेतकरी चिंतेत , संत्राला भाव नाही*

*नरखेड ,मोवाड व इतर गावातील शेतकरी चिंतेत , संत्राला भाव नाही*

नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – व्यापारी संत्री खरेदी करण्यासाठी येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मोवाड शहरात ४६५ हेक्टर मध्ये संत्रा बागा आहे.यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादन समाधानकारक झाले मात्र ,बागेत असलेली संत्री घेण्यासाठी खरेदीदार उतरत नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे.
या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे आतापर्यंत संत्राबागामध्ये ओलावा होता. त्यामुळे संत्र्याची गळ मोठ्या प्रमाणात झाली. ज्यामुळे खरेदीदार व्यापारी संत्राबागा बघण्यासाठी येत होते.त्यावेळी मोठ्या प्रमाणात फळबाग दिसत होती. परिणामी खरेदीदार अल्प दर सांगत आहे. शहरात संत्रा व्यापारी ८००० ते १०,००० रुपये टन संत्री मागत आहे.


तो दर परवडणारा नसल्याने शहरतील संत्राबागा आजही ‘ जैसे थे ‘ असवस्थेत दिसून येत आहे. तसेच जास्त प्रमाणात माला असल्याने भावही नाही . नागपूरला विक्री साठी नेतो म्हटल तर तेही परवडत नसल्याने तसेच व्यापारी कमी किमतीत बागा मागत असल्याने शेतकरी त्यांना बागा देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जेथे माल कमी किमतीत मिळतो तेथूनच व्यापारी खरेदी करत आहे. मात्र या भागात ते फटकतही नाही असे दिसून येत आहे.
या भागात संत्रा बागा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना व्हायरस मुळे मोठे संत्रा मार्केट बंद असल्याने आम्ही तुमच्याकडून घेतलेला माल कुणाला विकायचा असा प्रतिप्रश्नही खरेदीदार करत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हताश झाला आहे.
दरम्यान संत्राबागाच्या जागेत लावलेले सोयाबीन व इतर पिके यंदाच्या हंगामात उलटल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही.

यामुळे शेतकरी पुढे आपले जिवन कसे जगावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी ही शासनाने शेतकऱ्यांच्या अशा अनेक गंभीर समस्या कडे लक्षा देउन ही समस्या सोडविणयात मदत करावी अशी मागणी जोरधरत आहेत.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …