*पोलीस दलावर प्राणघातक हल्ला…*
*पोलीस उपविभागीय अधिकार, एसआय सह पोलीस कर्मचारी जखमी…*
*पारधी बेड्यातील आरोपी पोलीस पथकावर हमला करतात असेल तर सामान्य जनतेचे काय?*
मुख्य संपादक – किशोर ढुंढेले (सावनेर)
*सावनेरःसावनेर पो.स्टे.हद्दीतील चोरीची मोबाईल मीळण्याचे व अवैध व्यवसाया करीता पारधी बेडा या नावाने प्रसिद्ध मांडवी येथे अवैध धंद्या बाबत चौकशी करण्यास गेलेल्या पोलीस दलावर आरोपी व गावकर्यांनी एकच हल्ला चढविल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी सह स्थानिक गुन्हे शाखेचे एसआय सह पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले.*
*प्राप्त माहिती नुसार सावनेर पो.स्टे.हद्दीतील मांडवी येथील पारधी बेड्यावर अवैध दारु व चोरीचे मोबाईल ची मोठ्या प्रमाणात विक्रिचा व्यवसाय करणार्या लोकांची सक्रियता असल्याने नागपूर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या दिशानिदेशात स्थानिक गुन्हे शाखा कळमेश्वर,सावनेर पोलीस स्टेशन यांना कारवाई चे आदेश दीले तदनूसार पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी सदर धाडी करता एक गोपनीय पथक तयार करून मंगळवार ला पारधी बेड्यावर धाड टाकण्यात आली.*
*आरोपी रेवीसराम यांच्या घरी झडती घेत असतांना आरोपीने पोलीसांना शिवीगाळ करत आरडाओरड करुण लोकांना गोळा करत पोलीसांना काही लक्षात येताच मीर्ची पावडर हवेत भीरकवून लाठीकाठी व दगडांनी प्राणघातक हल्ला चढविला या हल्यात पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सरंबळकर ,स्थानिक गुन्हे शाखेचे एसआय नरेन्द्र गौरखेडे,पोलीस सीपाई महेश बिसेन,सुशील खोब्रागडे,पुष्पा आकरे,पोलीस पाटील सतीश जळीत गंभीर स्वरूपात जखमी झाले जखमी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे प्राथमिक उपचार करुण पुढील उपचारा करीता मेडिकल हाँस्पिटल नागपूर हलवीण्यात आले…*
*पोलीस दलावर घडलेला या प्राणघातक हल्याची सुचना सावनेर पोलीसांना प्राप्त होताच सावनेर पोलिसांनी तात्काळ विशेष पथक तयार करुण पारधी बेड्याची घेराबंदी करुण रेविसलाल सुजीराम चव्हाण, लक्षाजपुत,संतोष किर्तीसिंग चव्हाण, रामस्वरुप,अनोमा भोसले,रविस्नाबाई अजय राजपुत,आयस्ना धमेरसिंग चव्हाण, अश्या 9 ओरोपींना अटक करुण भादवी 307,353,144,147,148,504,506 कलम अन्वये गुन्हाची नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कोळी करत आहे.*
*यापूर्वी ही मांडवी येथील पारधी बेड्यावर असे हल्ले नेहमीची बाब असल्याचे बोलल्या जात असुन यापूर्वी अशी एवढी मोठी अप्रीय घटना घडल्या नसल्यामुळे त्याची दखल घेतल्या जात नव्होती परंतू मंगळवार ला घडलेल्या सदर हल्याने पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी जाम जखमी झाल्याने तसेच आरोपी जेरबंद होऊण मध्यवर्ती कारागु्हात रवानगी करुण तपास कार्य सुरु असल्याने मांढवी परीसरात तनावपुर्ण स्थिती निर्माण आहे.*
*सावनेर कळमेश्वर पोलिस स्टेशन सह जिल्ह्यातील अनेक ठीकाणी घरफोडी,चोरी,मोबाईल चोरी सारख्या घटना वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण असुन सदर घटनांना मुर्तरुप देण्याचा संशय सदर पारधी बेडा मांडवी वर घरल्याजात आहे तालुक्यातील चोरीवर आळा बसविन्याकरीता सदर पारधीबेड्यावर सतत धाडी टाकून चोरी,मोबाईल चोरी,घरफोडी सारख्या घटनांनवर आळा बसविन्यात यावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे…*