*लाभार्थ्यां मध्ये रोष : आर्वी शहरात २ हजार १२३ लाभार्थी* *पंतप्रधान आवास योजनेच्या हप्त्याअभावी शेकडो घरे अर्धवट*

*लाभार्थ्यां मध्ये रोष : आर्वी शहरात २ हजार १२३ लाभार्थी*

*पंतप्रधान आवास योजनेच्या हप्त्याअभावी शेकडो घरे अर्धवट*

 

कोरोना संकटाने आर्थिक संकट ओढवले. हाताची कामे गेल्याने बेरोजगारीची कुºहाड कोसळली. अशाही परिस्थितीत गाठीशी असलेला पैसा खर्च करुन घराची कामे पूर्ण केली. काहींची कामे अर्धवट राहिली असून आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र, वर्ष निघून गेले पण हप्ता मिळाला नाही. 

वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे

आर्वी : सर्वांसाठी घरे, या सकंल्पनेतून पंधप्रधान आवास योजना राबविण्यात आली. मात्र, बारा महिन्यांचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना अद्याप अर्धे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली असून ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशीच अवस्था झाल्याने रोष व्यक्त होत आहे.  

कोरोना संकटाने आर्थिक संकट ओढवले. हाताची कामे गेल्याने बेरोजगारीची कुºहाड कोसळली. अशाही परिस्थितीत गाठीशी असलेला पैसा खर्च करुन घराची कामे पूर्ण केली. काहींची कामे अर्धवट राहिली असून आज ना उद्या घरकुलाचे हप्ते मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र, वर्ष निघून गेले पण हप्ता मिळाला नाही. 

शासनाकडून घरकुल मंजूर झाल्याने आपली जीर्ण झालेली घरे पाडून आवास योजनेसाठी नवीन घरे बांधायला सुरुवात केली. अनेकांनी किरायाच्या घरी राहून घरकुलाच्या कामाला सुरुवात केली. उसनवारीने पैसे घेऊन अनेकांनी घराचे बांधकाम पूर्णत्वास नेले. पण, आता हप्ते मिळाले नसल्याने घरकुलाचे बांधकाम थांबले आहे. 

एकीकडे घर बांधकामाची चिंता आणि दुसरीकडे घरभाड्याचा भार यामुळे लाभार्थी आता आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. 
अनेकदा नगरपालिकेत विचारणा केल्यावरही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.

सहा टप्प्यात मिळतोय निधी
योजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासना मिळून २ लाख ५० हजार रुपये लाभार्थ्यांना देतात. त्यामध्ये राज्य शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख रुपयांतून पहिल्या टप्प्यात ४० टक्के, दुसऱ्या टप्प्यात ४० टक्के तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के रक्कम दिली जाते. तर केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या दीड लाखांतून पहिल्या टप्प्यात ६० टक्के, दुसऱ्या ६० तर तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी दिला जातो.अशा एकूण सहा टप्प्यात लाभार्थ्यांला निधी वितरित केला जातो.

केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या निधीचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे. पण उर्वरित निधी आलाच नसल्याने लाभार्थ्यांना कसा देणार? लाभार्थी अनेकदा विचारतात. त्यांना निधी आल्यावर मिळेल असे सांगितले जाते. तसा बाहेर फलकही लावण्यात आला आहे. आम्ही निधीची मागणी केली असून सतत पाठपुरावा करीत आहोत. 
साकेत राऊत,अभियंता, नगरपरिषद आर्वी

पालिकेला निधी प्रतीक्षा 
आर्वी नगरपालिका अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ हजार १२९ घरे पहिल्यांदा मंजूर झाली. त्यात राज्य सरकारचे ९०३.०२ लाख निधी उपलब्ध झाला होता. तो तीन टप्प्यात लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला.  तर केंद्र शासनाकडून आलेला ६७७.०४ लाख रुपयांचा निधी दोन टप्प्यात लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला. मात्र तीस हजाराचा केंद्र शासनाचा निधी अद्यापही नगरपालिकेला मिळाला नाही. दुसºया टप्प्यात १ हजार ४ घरे मंजूर करण्यात आली. यात राज्य शासनाचा ४०१.०६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याने दोन टप्प्यात ४०-४० टक्के निधी लाभार्थ्यांना वितरित केला. यातील वीस हजारांचा हप्ता राज्य शासनाने पाठविला नाही.  तसेच केंद्र शासनाने तिनही हप्ते पालिकेका पाठविले नाहीत.

मागील एक वर्षांपासून आम्हाला आवास योजनेचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. जुने  घर पाडून आम्ही नवीन घर बांधायला सुरुवात केली आहे. राहण्याची अडचण असल्याने किरायाच्या घरात राहतो. आता किराया किती दिवस भरणार, त्याचे पैसे कोण देणार.
राजू अंभोरे,लाभार्थी, श्रीराम वॉर्ड

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …