*एकच मिशन शेतकरी आरक्षणचे सेवाकार्य*
*दिल्लीच्या आंदोलनकर्त्यासाठी वर्ध्याहून सरसावले मदतीचे हात*
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांना जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे काम वर्धा व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्ते करीत आहे.
वर्धा : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांना जीवनावश्यक वस्तु पुरविण्याचे काम वर्धा व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्ते करीत आहे. एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या माध्यमातून हे सेवाकार्य मागील पाच दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. केंद्र सरकारने अलीकडेच केलेल्या तीनही कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे. या आंदोलनात वर्धा व अमरावती जिल्ह्यातून एकच मिशन शेतकरी आरक्षणचे शेकडो कार्यकर्ते मिशनचे नेते शैलेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी टिकरी सिमेवर आंदोलकांना दुध, नास्ता, जेवन, औषध वाटप करण्याचे काम एकच मिशन शेतकरी आरक्षणने सुरू केले आहे.
देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सेवार्थ स्टाॅल लावण्यात आले आहे. भोजनाच्या स्टाॅलचे व्यवस्थापन निहाल पांडे, दुध, चहा, नास्ता स्टाॅलचे व्यवस्थापन स्वप्नील कामडी, वैद्यकीय तपासणी व औषध वाटपाची जबाबदारी विशाल इचपांडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. एकच मिशन शेतकरी आरक्षण २०१७ पासून देशव्यापी काम करित आहे. देशातील शेतकऱ्यांना शास्वत शेती विकासाची हमी मिळवून देण्यासाठी एकच मिशन शेतकरी आरक्षणने मातीला (शेती आरक्षण) आरक्षणाचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्र सरकारला सादर केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने या प्रस्तावाच्या भूमिकेबाबतही देशभरातील शेतकऱ्यांना शैलेश अग्रवाल मार्गदर्शन करीत आहे.
देशभरातून आलेल्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील शेतकरी व जनता उभी आहे. दुरचे अंतर व कोरोनाची अडचण यामुळे प्रवास शक्य नसल्याने अनेक शेतकरी आंदोलन स्थळी पोहचू शकले नसले तरी या सेवा कार्यातून त्यांचाही पाठींबा आंदोलनाला आहे. हा संदेश देशात पोहचविण्याचे काम हाेत आहे. याचे आपल्याला समाधान आहे.
– शैलेश अग्रवाल
नेते एकच मिशन शेतकरी आरक्षण.