*विक्रीपत्र झालेल्या जमिनीवर हक्क सोडण्याचा दबाव*

*विक्रीपत्र झालेल्या जमिनीवर हक्क सोडण्याचा दबाव*

*महिलांनी दिले नायब तहसीलदार यांना निवेदन*

मुशिर सैय्यद मोहपा

*कळमेश्वर तालुक्यातील साहुली आलेसुर या गावातील महिलांनी विक्रीपत्र केलेल्या जमिनीवर घरे बांधली असून त्यांना विक्रीपत्र लिहून देणाऱ्या शेतकऱ्यांनी वकील द्वारे नोटीस पाठवून योग्य तो मोबदला द्या अन्यथा जमिनीवरील हक्क सोडा अशी नोटीस बजावली असून या प्रकरणात योग्य ती चौकशी करून न्याय मिळवून द्यावा याकरिता नायब तहसीलदार भुजाडे यांना निवेदन दिले याप्रसंगी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे जी.प. नागपूर,माजी सभापती वैभव घोंगे,माजी उपसभापती नरेंद्र पालकर हे उपस्थित होते.*
*गैरअर्जदार यांनी सन 1947 मध्ये आपली जमीन भगवानराव मस्के,तातेराव मस्के,पुंडलिक,तुकाराम, बापूराव श्रावण मस्के यांच्याकडून मोबदला घेऊन विक्रीपत्र करून करून दिले व त्या विक्री पत्रात त्या जमिनीवर आमचा हक्क राहणार नाही या जमिनीवर तुम्ही घरे बांधू शकता व वारसान हक्क राहणार नाही असे लिहून दिले व या जमिनीवर गावकऱ्यांनी घरे बांधली व ते तेथे राहू लागले मात्र मागील एक वर्षापासून गैरअर्जदार यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवून व नोटीस वाचून प्रत्येकाने दहा हजार रुपये द्यावे तसेच माझ्या जमिनीचा प्रत्येकांनी योग्य तो मोबदला द्यावा अन्यथा 15 दिवसाच्या आत घरी खाली करावी अशी नोटीस बजावली आहे. 70 वर्षानंतर गैरअर्जदार याने विक्रीपत्र असून सुद्धा घरे खाली करण्यात यावी अशी वकील द्वारे नोटीस दिल्याने त्या जागेवर राहत असलेल्या गावातील महिलांनी याप्रकरणी आम्हाला न्याय मिळावा यासाठी नायब तहसीलदार भुजाडे यांना निवेदन दिले आहे निवेदन देताना शेवंताबाई वसाके,शिवदास शेंडे सुमनबाई ठाकरे,अनुसयाबाई मस्के,सुनीताबाई मस्के,वर्षा ठाकरे,सुमन ठाकरे,सुमन म्हस्के, भामाबाई मोहरलेे,कृष्णा मोहरले,वामन मोहरले,दीपक मस्के,रमेश वंजारी,साधना वंजारी,सचिन सातपुते,गणेश काळबांडे,यमुना मोहरले, अमित मोहरले व इतर महिला व पुरुष उपस्थित होते.*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …