*७३ नगरिकांनी घेतला निशुल्क रोग निदान शिविराचा लाभ*

*७३ नगरिकांनी घेतला निशुल्क रोग निदान शिविराचा लाभ*

कन्हान प्रतिनिधी – ऋषभ बावनकर

कन्हान – बुध्दीष्ठ वेलफेयर सोसायटी चे सदस्य सभाजी उके यांचा प्रथम स्मृती दिवसा निमित्य भव्य रोग निदान शिविराचे आयोजन करण्यात आले असुन ७३ नागरिकांनी या भव्य रोग निदान शिविराचा लाभ घेत सभाजी ऊके यांचा प्रथम स्मृति दिवस साजरा करण्यात आला .


रविवार दिनांक १३ डिसेंबर २०२० रोजी बुध्दीष्ठ वेलफेयर सोसायटी चे सदस्य सभाजी उके यांचा प्रथम स्मृती दिवसा निमित्य गणेश नगर च्या बुद्ध विहार येथे भव्य रोग निदान शिविर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शहरातल्या ७३ नागरिकांनी या शिविराचा लाभ घेत लाईफ लाईन हाॅस्पिटल कामठी मधल्या डाॅक्टर्स , नर्स यांचा कडुन सर्व नागरिकांनी हार्ट , शुगर , ब्लड प्रेशर , दमा , अस्थमा व इतर रोगाची तपासणी केली . यावेळी सर्व नागरिकांना मोफत औषधे वाटप करुन सभाजी ऊके यांचा प्रथम स्मृति दिवस साजरा करण्यात आला .
शिविर यश्स्वी करण्याकरिता भगवान नितनवरे , पुनम ऊके , प्रशांत मसार , रजनिश मेश्राम , अमोल राऊत , दिपक तिवाडे , चंदन मेश्राम , विलास शेंडे सहित आदि ने सहकार्य केले .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …