*स्टार बस शुभारंभ प्रसंगी राडा*
*काँग्रेस भाजप कार्यकर्ते आमोरासामोर*
*रंगले आरोप प्रत्यारोपाचे पर्व*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सावनेर*
*सावनेरःतालुक्यातील सिल्लेवाडा या गावाकरिता मोर भवन नागपूर ते सिल्लेवाडा व सिल्लेवाडा ते मोर भवन अशी बस सेवा सुरु करण्याची बहुप्रक्षेपीत मागणी नागरिकां तुन होत होती सदर मागनीची पुर्तता म्हणून नागपूर महानगर पालीकेच्या परिवहन कार्यालयाचे अधिकारी यांच्या सुचने नुसार दि.12सप्टेंबर पासुन ही बस सेवा सुरु होणार असल्याने गावकर्यांत उत्साहाचे वातावरण होते.*
*12 सप्टेंबर पासुन ही बस सेवा सुरु होणार म्हणून याकरिता ग्राम पंचायत सिल्लेवाडा सरपंच यांनी क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्या हस्ते तर भाजप कर्यकर्ते सिल्लेवाडा यांनी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार यांच्या हस्ते बसच्या शुभारंभा करीता आपआपले पंडाल थाटले व बस येण्याची वाट बघू लागले.*
*दि.12 सप्टेंबर ला ठरल्या प्रमाणे स्टार बस चे सिल्लेवाडा गावात आगमन होताच नागरिकांत उत्साह संचारला बघता बघता ती बस भाजप कार्यकर्ते आपल्या शुभारंभ स्थळावर घेऊण गेले असल्याचा आरोप गावकरी करत असतांनाच ही बाभ काँग्रेस पक्षाच्या सरपंचा यांना कळताच त्यानी आपल्या व आपले पक्षाचे आमदार यांच्या प्रयत्नानी सदर स्टार बस सेवा सुरु होत असुन त्या गावच्या प्रथम नागरिक असुन त्यांच्या अधिकाराचे हनन होत असल्याचा आरोप करत भाजपच्या या शुभारंभाचा विरोध नोंदवत सदर आयोजनाचे श्रेय लाटन्याचे प्रयत्न भाजप कार्यकर्ते करत असल्याचा आरोप करत आमदार सुनील केदार सह काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपाच्या कार्यक्रममंडपात पोहचून भाजप कार्यकर्ते स्थानिक सरपंच,ग्राम पंचायत सदस्यांना डावलत असल्याचा जाब विचारला असता दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते ऊग्र होऊण आरोप प्रत्यारोपाच्या फैरी रंगुन शब्दिक चकमकी सुरु झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.*
*मिळालेल्या माहीतीनुसार सिल्लेवाडा ग्राम पंचायत च्या सरपंचा यांनी पुढाकार घेऊन 1आँगस्ट ला संपन्न मासिक बैठकीत सदर स्टार बस सुरु करण्याचा ठराव सर्वानुमते पारीत खरीत नागपूर महानगर पालीकेच्या परिवहन विभागास सुचना देऊण बहुप्रक्षेपीत सिल्लेवाडा नागपूर अशी स्टार बस सेवा सुरु करण्याची विनंती केली होती तर माजी जी.प.सदस्य अशोक तांदूळकर यांनी सुध्दा बस सेवा सुरू करुण घेण्यात त्याचा व भाजप जिल्हाध्यक्ष यांचा मोलाचा वाटा असल्याचे बोलून दाखवले.*
*होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजले असुन केव्हाही निवडणूकां घोषित होऊण आचार संहिता लागू शकतात म्हणूनच सर्वत्र नवीन बाधकामांचे शुभारंभ व नव्याने सुरु होत असलेल्या बांधकामांचे भुमिपुजनाच्या कार्यक्रमास उधान आले आहे*
*निवडणूकीच्या तोंडावर घडलेला या घटनेचे प्रतीसाद आगामी विधानसभा निवडणूकीवर कीतपत पडणार व घडलेल्या याप्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हयरल होत असल्याने सिल्लेवाडा परिसरात शांतीपुर्व तणावाचे वातावरण निर्माण असुन सदर घटनेचे बतम्या सोशल मीडिया न्यूजवर प्रकाशित होत असुन दि.12 सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी ची वर्तमान पत्रांना सुटी असल्यामुळे घटनेची तिव्रता व पडसाद काय पडणार व दोन्हीही पक्ष पुढचे काय पाऊल उचलतात यावर क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.*