*पोलीस स्टेशन रामटेक येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न* *61 रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*पोलीस स्टेशन रामटेक येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

 

*61 रक्तदात्यांनी केले रक्तदान*

रामटेक प्रतिनिधी :-पंकज चौधरी

रामटेक – सद्या कोरोना संक्रमणाच्या महामारीने सम्पूर्ण जग हादरून गेला आहे.अश्यातच कोरोनाग्रस्त व्यक्ती दिवसेंदिवस आढळून येतांना निदर्शनास येत आहे.म्हणून महाराष्टाच्या आरोग्य मंत्र्यांनी असे आव्हान केले होते की,रक्त संक्रमणाच्या काळात जास्तीत जास्त रक्तदान शिबीर राबविण्यात यावे.यालाच पाठिंबा म्हणून आज दि.14 डिसेंबर 2020 ला रामटेक पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद मकेश्वर साहेब यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन समोर आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्री.जोगेंद्र कटयारे साहेब व तहसीलदार म्हस्के साहेब यांच्या हस्ते झाले.अंदाजे 61 रक्त दात्यांनी या शिबिरात सहभाग दर्शवुन रक्तदान केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …