*विसर्जनला गेलेल्या पाण्यात बुडुनया मृत्यु.*
*कुही तालुक्यातील गोठणगाव येथील दूदैवी घटना.*
(*दिलीप चव्हाण कुही*)
*कुही तालुक्यातील पचखेडी पासून अवध्या चार कि.मि अंतरावर व उमरेड क-हांडला अभयारण्यालगत असलेल्या गोठनगाव येथील गुलाब शामराव डंभारे( 52)हे 12/9/2019ला गणपती विसर्जनाला गेले विसर्जन आटोपल्यानंतर पाण्याच्या शेजारी शौचविधीला बसले असता पाय घसरला पाणी जास्त असयाने गुलाबचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला.*
*गोठनगाव येथे गा़वक-यानी एकत्र येत एक गाव एक गणपती एका गावात एकच गणपती असा स्तुत्य उपक्रम माजी सरपंच कैलास हुडमे यांच्या संकल्पनेतुन सुरु केला.*
*येथे बसविलेल्या गणपतीचे विसर्जन 12/9 2019ला एकचे दरम्यान विसर्जन करण्यासाठी गेले असता गुलाब शामराव डंभारे हे विसर्जन झाल्यानंतर शौचवीधीला बसले चीखलामुळे पाय घसरला व तोल पाण्याचे दिशेने गेला या ठीकाणी खोल खडा असल्याने गुलाब खोल पाण्यात बुडाला.*
*गुलाब यानी जीव वाचवण्याचा खुप प्रयत्न केला याना पोहण्याचा अनुभव होता थोडा वेळ प्रयत्न केला परंतु पाणी खुप खोल असल्याने पाण्यात बुडुन मुत्यु झाला याची माहिती वा-यासारखी परीसरात पोहचताच अलोट गर्दी जमा झाली तात्काळ वेलतुर चे ठानेदार आनंद कवीराज हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले प्रेताला तात्काळ शोधुन काढले.*
*गुलाब यांच्या अंतयात्रेत मोठा जनसमुदाय होता या दुःखद घटनेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे नेते संजय मेश्राम भाजपाचे तालुका अध्यक्ष सुनिल जुवार , गोठनगावचे माजी सरपंच कैलास हुडमे ,शीशुपाल विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव वंजारी,रडके,बसपाचे परमानंद शेंडे याचेसह मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थीत होता*
*मु्तक गुलाब यांचे पश्चात एक मुलगा एक मुलगी,पत्नी असा परीवार आहे या कुटुंबाची शेती गोसेखुर्द प्रकल्पात गेली आता गुलाब यांच्या पत्नी समोर मुलांचे शीक्षण व पालनपोषणाचा मोठा प्रश्न आहे*