*करंट लागून मजुर युवकाचा अकस्मात मृत्यू*
*पाटणसावंगी येथील घटना*
विशेष प्रतिनिधी पाटणसावंगी
पाटनसावंगी – घर बांधकामावर पाणी मारत असताना कामगाराला अचानक विद्युत करंट लागल्याने खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना आज शुक्रवार दि १८ डिसेंबरला सकाळी ८:०० वाजता दरम्यान येथील पाटणसावंगी बायपास रोड लगत सावनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. रितीक दिवाकर हेलोंडे (१७) रा बाजार चौक पाटणसावंगी असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, रितीक हा आपल्या गरीब आई वडिलांना आर्थिक मदत म्हणून मिळेल ते काम करीत होता.
घटनेच्या दिवशी सकाळी तो येथील बायपास रोड लगत नव्याने तयार होत असलेल्या राय फार्म हाऊसवर नवीन बांधकामावर पाणी मारण्यासाठी कामावर गेला. स्विच जवळ गेला असता अचानक त्याला विद्युत करंट लागल्याने तो खाली पडला गेला व त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा. काही तासानंतर त्याच कामावर जेव्हा दुसरे बांधकाम करण्यासाठी मजुर आले तेव्हा त्यांना रितीक खाली पडला दिसला. लागलीच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यास नेण्यात आले रितीकचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्याने त्यास शव विच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले व दुपारी त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.रितीक च्या दुर्दैवी मृत्यू ने गावात नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.