*दोन आरोपी ने एटीएम कार्ड अदला – बदल करून ३३,७०० रूपये खात्यातुन उडवले* *कन्हान पुलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल*

*दोन आरोपी ने एटीएम कार्ड अदला – बदल करून ३३,७०० रूपये खात्यातुन उडवले*

*कन्हान पुलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – खंडाळा येथील रहिवासी संजय दिघडे हे कन्हान स्टेट बॅंकेच्या एटीएम मध्ये पैसे काढायला गेले असता अज्ञात दोन आरोपी ने एटीएम कार्ड अदला-बदल करून बॅंक खात्यातुन एटीएम कार्ड द्वारे ३३,७०० रूपये काढुन पसार झाले असता फिर्यादी संजय दिघडे यांचा लक्षात येत कन्हान पोलीस स्टेशन येथे अज्ञात दोन आरोपी विरुद्ध तक्रार टाकली असता कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला .
कन्हान स्टेट बॅंकेच्या एटीएम मध्ये दिनांक १५ डिसेंबर ला ५ .३० वाजता च्या सुमारास खंडाळा येथील रहिवासी संजय मधुकर दिघडे वय ४५ वर्ष हे कन्हान स्ट्रेट बॅंकेच्या एटीएम मध्ये पैसे काढायला आले असता त्यांच्या मागे अनोळखी दोघांनी मदत करतांना त्यांच्या एटीएम कार्ड अदला बदल करुन त्यांना पैसे निघत नाही आहे असे सांगितल्याने ते घरी गेल्यावर काही वेळानंतर १५ हजार व १० हजार आणि दुस-या दिवसी ८७०० असे एकुण ३३,७०० रूपए काढल्या चा मॅसेज मोबाईल वर आल्याने बॅकेंत जावुन विचारपुस केली असता त्यांच्या एटीएम कार्डची अदला बदल व कोड नंबर माहीत केले असता दोन अज्ञात आरोपी ने फिर्यादी संजय दिघडे यांचा बॅंक खात्यातुन एटीएम कार्ड व्दारे ३३,७००रुपये चोरी केल्याने दिनांक १७ डिसेंबर ला फिर्यादी संजय दिघडे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात दोन आरोपी विरूध्द कलम ४२०, ३७ भादंवि नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …