*पारडी शिवारात दरोडा घालणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीस पो. स्टे.पाराशिवनी गुन्हे प्रकटीकरण पथकाने ४,२८,४०० रुपयांचे मुद्देमालासह टोळीला केले जेरबंद*
विशेष प्रतिनिधि
पारशिवनी:-पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हदीतील पारडी शिवारा तिल तक्रारकर्ता प्रदीप अभिमन्यू साखरे वय 28 वर्ष राहणार वार्ड नंबर २ चनकापूर, खापरखेडा जिल्हा नागपूर हे गुरूवारी दि.१७ डिसेंबर रोजी त्यांचे इतर मित्रासह रोहणा गावा वरून पारडी मार्गे ईटगाव कडे त्यांचे होंडा सिटी कार ने जात असताना रात्रीचे १० वाजता चे दरम्यान कन्हान नदी वरील पाइपलाइनच्या पुलाजवळ पारडी शिवारात तीन अज्ञान इसमांनी एक्टिवा दुचाकी वरून येऊन फिर्यादीचे वाहनास अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचे सोन्याची चैन ,सोन्याचे ब्रेसलेट,सोन्याची दोन अंगठ्या, कानातील सोन्याची बाली, मोबाईल फोन असा एकूण तीन लाख सात हजार 500 रुपयांचा(३,०७,५००) मुद्देमाल जमीन हिसकावून नेल्याची घटना घडली होती, त्यावरून पोलीस स्टेशन पाराशिवनी येथे अपराध क्रमांक 316 /20 कलम 3
३९२,(अ) 341, 34 भादवी च्या गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य पाहता माननीय श्रीमती नयना आलुरकर उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक विभाग यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन जबरी चोरी करणारे टोळीच्या शोध घेऊन त्यांना त्वरित जेरबंद करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे संतोष वैरागडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पारशिवनी यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथका सह दोन तपास पथक तयार करण्यात आली , आरोपींचा शोध घेण्यात आला पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी अतिप्रसंग परिश्रम घेऊन गुन्ह्यातील आरोपी रमेश उर्फ कुट्टी रामकिसन रविदास ३१वर्ष, राहणार वार्ङ नंबर 3 चणकापूर खापरखेडा या स्थानिक गुन्हे शाखेने नागपूर ग्रामीण यांचे मदतीने ताब्यात घेऊन गुण या संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी माहिती दिली की फिर्यादी हा त्यांच्या मित्र असून तो नेहमीच स्वतःच्या अंगावर मौल्यवान दागिने सोन्याचे दागिने परिधान करतो, यावरून त्याने त्याचे इतर साथीदार सह मिळून फिर्यादीत लुटण्याच्या कट रचला त्या नुसार आरोपी शहजाद नसीमुद्दीन सिद्दीकी वय 36 वर्ष राहणार सिल्लेवाडा खापरखेडा, टिपू ऊर्फ जाकिर अली तुम्हाला वर्ल्ड हसमत आली इद्रीसी वय 28 वर्ष राहणार वार्ड क्रमांक ३ वलनी सावनेर, आशिष विजय शास्त्री 19 वर्ष दहेगाव खापरखेडा, निखिल अशोक पासवान राहणार दहेगाव रंगारी खापरखेडा यांचे मदतीने दिनांक 17 डिसेंबर रोजी घटना घडवून आणली यावरून पारशिवनी पोलिस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाने आपली गोपनीय यंत्रणा कार्यान्वित करून आरोपी शहजाद नसीमुद्दीन सिद्दीकी, आशिष विजय पारधी ,निखील अशोक पासवान ,यांना जेरबंद करून त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा एक्टिवा तसेच जबरीने हेच हिसकलेले दोन मोबाईल फोन जप्त केलेले, स्थानिक गुन्हे शाखेचे मदतीने गुन्ह्यातील आरोपी टिपू शाकिर अली वल्द हसमत यास ताब्यात घेऊन त्यांचेकडून फिर्यादी कडून जबरीने ईसकुट दिलेले सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले चाकू तसेच तलवार जप्त करण्यात आली असून पाचही आरोपी सध्या पोलीस स्टेशन पाराशिवनी येथे पी सी आर मध्ये हवालात बंद आहे, गुन्ह्यातील आरोपींनी असून घातक शास्त्राच्या धाक दाखवून दरोडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले गुन्ह्यात भादवि चे कलम 395 ,120 (ब) सहकलम चार ४, २५ भारतीय हत्यार कायदा कलम वाढ करण्यात आलेली आहे,
गुन्ह्यातील आरोपी कडून एकूण 7.5 तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली होंडा एक्टिवा मोपेड ,उन्हात वापरलेल्या चाकु ,1 तलवार असा एकूण (४,२८,४००)चार लाख 28 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून गुन्ह्याच्या पुढील तपास श्री संतोष वैरागडे पोलीस निरीक्षक पारशिवनी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानबा पळ्रनाते हे करीत आहे.
सदर कारवाई माननीय श्रीमती नयना लवकर विभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन पारशिवनी चे ठाणेदार संतोष वैरागडे पोलीस निरीक्षक ,पो उप नि ज्ञानबा पळणाते, डी बी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संदिपान उबाळे, पोलीस नायक मुद्दासर जमाल, संदीप कडू, पोलीस शिपाई अमोल मेघंरे,शुभम गायकवाड यांचे पथकाने पूर्ण केलेली आहे तसेच पोलीस स्टेशन खापरखेडा चे पोहवा उमेश ठाकरे ,विमान शेख व त्यांचे पथकाने शुद्ध सुद्धा के सहकार्य केलेले आहे.