*प्लास्टिक वापर टाळा*

*प्लास्टिक वापर टाळा*


*प्‍लास्‍टीकपासून मुक्‍तता व पर्यावरण संरक्षण काळाची गरज –

    डॉ.शरयू तायवाडे*

 

*प्रतिनिधी दिलीप येवले*

कोराडी-*प्‍लास्‍टीकपासून पर्यावरणावर मोठ्‍या प्रमाणात नूकसान होते.म्‍हणून विद्यार्थ्यानी प्‍लास्‍टीकच्‍या कोणत्‍याही वस्‍तूचा वापर हा आपल्या लहान वयापासून टाळला पाहीजे.या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.शरयू तायवाडे यांनी पब्‍लीक स्‍कूलच्‍या विद्‍यार्थ्‍यांना पर्यावरणाचे महत्‍व व प्‍लास्‍टीकपासून होणारे दुष्‍परिणाम याची माहिती समजावून सांगितली.*


*स्‍थानिय तायवाडे महाविद्‍यालय महादूला-कोराडी येथील सूक्ष्‍मजीवशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तायवाडे पब्‍लिक स्‍कूलमध्‍ये पर्यावरणसंदर्भात प्‍लास्‍टिकपासून होणार्‍या पर्यावरणीय र्‍हासाबाबत व स्‍वच्‍छतेविषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्‍यात आला.या कार्यक्रमातून शालेय विद्‍यार्थ्‍यांना पर्यावरणाचे व स्‍वच्‍छतेचे महत्‍व सुक्ष्‍मजीवशास्‍त्र विभागाच्‍या विद्‍यार्थ्‍यांनी पथनाट्‍याच्‍या माध्‍यमातून पटवून सांगितले.*
*या कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्‍थानी तायवाडे महाविद्‍यालयातील प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे तर प्रमुख पाहुणे म्‍हणून वनस्‍पतीशास्‍त्र विभागप्रमुख डॉ.सुवर्णा पाटील या होत्‍या. या कार्यक्रमाच्या यशस्‍वितेसाठी पब्‍लिकस्‍कूलच्‍या प्राचार्य पिंकी विरदी,सूक्ष्‍मजीवशास्‍त्र विभागप्रमुख डॉ.विजय चरडे यांनी परिश्रम घेतले.*
*वरील कार्यक्रम प्रा.श्‍वेता भिवनकर,प्रा.सोनाली शेंडे, प्रा.प्रज्ञा निकालजे यांच्‍या मार्गदर्शनाखाली अंकीता वनकर,तुशार भोयर ,दिव्‍या बाल्‍गोनीवार,अश्‍विनी डोले,निकीता तितरमारे,दिपाली रामधाम,अभिजीत खंडागळे,नेहा मोंगसे,प्रिया तिवारी,मयूरी नाकाडे ई.विद्‍यार्थ्‍यांनी पथनाट्‍याच्‍या माध्‍यमातून जनजागृती केली.या कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्‍यालयातील विद्‍यार्थ्‍यांकडून शालेय विद्‍यार्थ्‍यांना भेटवस्‍तू देवून पर्यावरण वाचविण्‍यासाठी व स्‍वच्‍छतेसाठी जनजागृती करण्‍यात आली.*

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …