*मधुचंद्रासाठी आलेल्या नवं दाम्पत्याला चोरट्याने लावला चुना*
*१लाख ८७ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या मौल्यवान वस्तू लंपास*
देवलापार प्रतिनिधी -पुरुषोत्तम डडमल
देवलापार – शनिवार २६ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन देवलापार हद्दीतील तुली विर बाग सिरोर्ट बांद्रा येथे नविन लग्न झालेले जोडपे नाताळच्या सुट्ट्यामध्ये मधुचंद्र साजरा करणेसाठी आले होते. हे नवं दांपत्य तुली रिसोर्टमधील खोली क्र . ३०८ मध्ये थांबलेले होते. त्याच दिवशी ०६:०० वा दरम्यान ते दोघे आपल्या रुम ला लॉक लाउन रिसोर्टमधील कॅटीनमध्ये चहा घेण्याकरिता गेले व चहा घेऊन अदाजे ७:०० वाजताच्या सुमारास परत आले असता त्यांना त्याचे रुमच्या बाथरुम मध्ये त्यांची सोन्याची साखळी पडलेली दिसली. त्यामुळे त्यातील महिलेने आपली पर्स पाहिली असता त्यामध्ये असलेल्या दोन सोन्याच्या बागडया प्रत्येकी १० ग्रॅम प्रमाणे एकुण २० ग्रॅम किमंत १लाख रुपये,मंगलसुत्र आणि डोरेले १७ ग्रॅम वजनी किंमत ८५ हजार रुपये, ब्यागमध्ये ठेवलेले २हजार रुपये असा एकुण १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी बाथरुमचे बाजुला असलेल्या अर्धवट खुल्या भिंतीवरून रुमचे आत प्रवेश करुन चोरुन नेले .
अशा खबरेवरुन पोलीस स्टेशन देवलापार चे ठाणेदार प्रविण बोरकुटे हे पोलीस स्टॉफसह त्वरीत घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली व चोरी झाल्याचे निर्दशनास येताच श्वान पथक आणि अंगुलीमुद्रा तज्ञांना पाचारण केले.सदर दोन्ही टिम तुली रिसोर्ट येथे पोहचुन त्यांचे मार्फतीने परिसराची पाहणी करुन योग्य तपास करण्यात आला.तसेच ठाणेदार प्रविण बोरकुटे यांनी रिसोर्ट मध्ये काम करणाऱ्या लोकांची कसुन चौकशी केली असुन अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे .
सदर चोरीबाबत पोलीस स्टेशनमध्ये कलम ३८०,४५४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद असुन गुन्हयाचा पुढील तपास देवलापारचे ठाणेदार प्रविण बोरकुटे करीत आहे .
तुली वीर बाग हे रिसोर्ट जंगल भागात आत असून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित मानल्या जाते. तसेच या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले असतांना या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या मौल्यवान वस्तूची चोरी होणे यामुळे तेथील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होते.येणाऱ्या पर्यटकांसोबत अशाच घटना घडल्यातर याची जवाबदारी घेणार कोण ?