*भव्य शेतकरी, वीज व विदर्भ मेळावा संपन्न*
*शेतकरी,शेतमजूर,सुशिक्षित अशिक्षित बेरोजगारांचा छळ करणार्यांना त्याची जागा दाखवू*
(अरुण केदार)
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सावनेर*
सावनेर *नागपूर जिल्हा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समिती व्दारे दी 13सप्टेंबर2019 रोज शुक्रवारला भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन जनता सेलिब्रेशन हाँल केळवद रोड सावनेर येथे करण्यात आले असुन सदर मेळाव्यास शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण केदार, विदर्भ निर्माण महामंच समन्वयक व वरिष्ठ शेतकरी नेते राम नेवले, विदर्भ प्रदेश अद्यक्षा रंजना मामर्डे,आदींनी सदर मेळाव्याच्या माध्यमातून शेतकर्यांची संपूर्ण कर्ज मुक्ती झालीच पाहिजे,शेतकर्यांच्या शेतमालाला रास्त भाव देवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार पन्नास टक्के मुनाफा भाव देण्यात यावा,शेतकरी व शेतमजूरांना पेंशन मीळाली पाहिजे, शेतकर्यांचे कु्षी पंपाची लोडशेंडीग बंद झाली पाहिजे, ग्रामीण भागातील लोडशेडींग संपवून उच्च दाबाची वीज मीळाली पाहिजे, दिल्लीप्रमाणे विजेचे दर निम्मे झाले पाहिजे तसेच ग्रामीण भागातील सर्व सुशिक्षित अशिक्षित बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे अश्या विविध मागण्या करीता आंदोलनात्म रुपरेषा तयार करणे आदींवर मार्गदर्शन केले या मेळाव्या तालुक्यातील सर्व शेतकरी,शेतमजूर,सुशिक्षित अशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी मोठ्या संखेने उपस्थित होते.*
*या प्रसंगी बोलतांना अरुण केदार म्हणाले की आम्ही गरीब आहोत,शेतकरी आहोत म्हणून राज्यकर्ते म्हणतात की निवडून या आणी वेगळा विदर्भ घ्या आणी आपल्या शेतकर्यांचे लाड पुरवा म्हणून आता विदर्भातील सर्व शेतकरी व विदर्भवादी निवडनुकीच्या माध्यमातून जनतेपुढे जाणार व राज्यकर्ते यांनी शेतकर्यांनवर केलेले अतोनात अन्यायच आमच्या विजयाचा मार्ग सुकर करेल असे ठाम मत याप्रसंगी व्यक्त केले.*
*संचालन दिलीप घोरमारे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी शेतकरी संघटना यांनी तर आभार वु्षभ वानखेडे यांनी मानले.*
*याप्रसंगी वरिष्ठ शेतकरी नेते सेवकराम राउत,शेषराव आटोने,दिनेश इंगोले,रविना श्यामकुळे,ऋषभ वानखेडे,नंदु ठाकुर कु्ष्णाजी राऊत,सहीत क्षेत्रातील शेकडो महीला पुरुष शेतकरी बांधव उपस्थित होते*