*कोवीड़ 19 योद्धा सुनील शेंडे यांना शासनाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली*
*मा.मंत्री सुनील केदारांचा हस्ते 50 लक्ष रुपयाचा धनादेश शासनातर्फे सहानुग्रह सहायता नीधी कुटुंबीयांना भेट*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – पंचायत समिती सावनेरचे विस्तार अधिकारी स्व.सुनील शेंडे यांचा कोवीड़ 19 च्या संसर्गाने मु्त्यू झाला होता.त्यांना कोरोना योद्धा व मरनोपरांत महाराष्ट्र शासनातर्फे 50 लक्ष रुपयाचा धनादेश राज्य शासनाचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.सुनीलबाबू केदार यांच्या हस्ते 50 लक्ष रुपयाचा धनादेश सहानुग्रह सहायता राशी म्हणून प्रदान करण्यात आली.तसेच तालुक्यातील दिव्यांगांना तीन चाकी सायकल रिक्षा व जिल्हापरिषदेच्या पशुपालन विभागाव्दारे 115 लाभार्थ्यांना 6 बकर्या 1 बोकड़ असे 825 बकर्या व 25 लाभार्थ्यांन्या प्रत्येकी दोन अश्या 50 दुधारू गाई तसेच इतर योजनेतील लाभार्थांना साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा.रश्मी बर्वे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपुर,मा.मनोहर कुंभारे उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर, जिल्हापरिषद नागपुर चे मुख्य कार्यपालन अधिकारी मा.योगेश कुंभेजकर,उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,पशु पालन सभापती तापेश्वर वैद्द,जिल्हा परिषदेचे सर्व समीती सभापती व सदस्य,पंचायत समीती सावनेर सभापती अरूणा शिंदे,उपसभापती प्रकाश पराते पंचायत समीती सदस्य गोविंदा ठाकरे,नायब तहसीलदार चैताली दराडे,सावनेर तालुका अध्यक्ष सतीश लेकुरवाळे पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच तालुक्यातुन आलेले लाभार्थी व त्यांचे अभीभावक प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिवंगत कोवीड़ योध्दा स्व.सुनील शेंडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वना देत नागपुर जिल्हापरिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या महामारीत विपरित परिस्थितीत केलेल्या कार्याचे विवेचन करुण त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे आभार मानले.तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मोनोहर कुंभारे यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की स्व.सुनील शेंडे हे कर्तव्यदक्ष व मनमीळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातुन हिरावून गेले आहे ईश्वर त्याच्या पावन आत्मेस शांती प्रदान करो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुखःतुन सावरण्याची हिम्मत देवो अशी प्रार्थना करत म्हटले की मंत्री महोदय ना.सुनील भाऊंच्या मार्गदर्शन व दिशानिर्देशात आम्ही सर्व जिल्हापरिषदेचे पदाधिकारी कर्यरत आहो.त्याचेच प्रतिफळ म्हणून केन्द्र व राज्य शासनाच्या”जल जिवन योजना” अंतर्गत नागपुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास 91 हजार नवीन नळ जोडनी करूण “जीथे घर तीथे शुध्द पेयजल” ही योजना शंभर टक्के पुर्ण करुन संपूर्ण राज्यात ही योजना पुर्ण करणारे दोन जिल्हे म्हणजे एक नागपुर व दुसरा कोल्हापूर असे लौकीक कार्य ते ही कोरोना महामारीच्या विषम परिस्थितीत पुर्ण करण्याचा मान आम्हांस केदार साहेबांच्या वेळोवेळी योग्य मार्गदर्शानामुळेच शक्य झाले व इतर योजनांचेही नियोजन व कार्य समाधान कारक असल्याचा विश्वास व्यक्त केला.
तर राज्याचे मंत्री सुनील बाबू केदार यांनी आपल्या संबोधनाची सुरुवात सावनेर पंचायत समितीचे दिवंगत विस्तार अधिकारी स्व.सुनील शेंडे यांना स्वतः व राज्य शासनाच्या वतीने श्रध्दांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन देत म्हटले की घाबरु नका शासन आपल्या सुखःदुखःत सहभागी आहे.तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व विषय समीतीचे सभापती,मुख्य कार्यपालन अधिकारी, कर्मचारी, पंचायत समितीचे सर्व सभापती,सदस्य ,अधिकारी कर्मचारी यांनी या जिवघेण्या कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा नकरता ग्रामीण भागात कोरोना विषाणूचे प्रादुर्भाव व संसर्ग वाढू दीला नाही ही कौतुकास्पद बाब आहे.तर जिल्हापरिषद व पंचायत समीत्यांनी या विषम परिस्थितीत ही केन्द्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी “जल जिवन योजना” जिल्ह्यात शंभर टक्के पुर्तत्वास नेली.अश्याच प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना ,घरकुल योजनाही यशस्वी कराव्यात त्यात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ही आपले वीचार मांडले.कार्यक्रमाचे संचालन आरोग्य अधिकारी मधुकर सोनवाने यांनी तर प्रास्ताविक गटविकास अधिकारी अनिल नागणे तर आभार बिडीओ दिपक गरुड यांनी मानले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्व.सुनील शेंडे यांच्या तैलचित्राचे पुजन करुण तर सांगता त्यांचे दिंव्यांगत आत्मेला चिर शांती प्रदान होओ करीता दोन मिनिटे मौन पाळू करण्यात आली.