*गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या…*
*सावनेर च्या राज्याला थाटात भावपूर्ण निरोप*
*सुंदर देखावे,टाळ मुदंग व भजन मंडळी व्दारे काढली भव्य मीरवनूक*
मुख्य संपादक- किशोर ढुंढेले (सावनेर)
*सावनेरः नगरीतील प्रतिष्ठीत गणपती समझल्या जाणारा कु्षी उत्पन्न बाजार समीती सावनेर येथील “सावनेर चा राजा” श्री मुर्तीचे विसर्जन टाळ मु्दंग, भजन मंडळी च्या मधुर भजन व भक्ती गीतांनी थाटात करण्यात आला.*
*याप्रसंगी कु्षी उत्पन्न बाजार समीतेचे सभापती बंडु चौधरी,व्यापारी संघ सावनेर चे अध्यक्ष विनोद जैन,मनोज बसवार,नरेन्द्र वाघेला,बबलु जैन,दिलीप घटे,अरुण मौजे,मोहन कामदार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते*
*गणेश चतुर्थी ला स्थापना झाल्या पासुन स्वचलीत देखावे,मनोरंजनाचे विविध उपक्रम, खेळनीची दुकाने ईत्यादीने कु्षी उत्पन्न बाजार समीती परीसराला जत्रेचे स्वरूप आले होते तर गणेशोत्सव दरम्यान सावनेर शहरा सह तालुक्यातील हजारो हजार नागरिकांनी आपल्या लाडल्या “सावनेरच्या राज्याचे दर्शन घेतल्याची माहीती विनोद जैन यांनी दीली.तर सावनेरच्या राज्याची महाआरती करीता क्षेत्राचे आमदार सुनील केदार सह अनेक गणमान्य नागरीकांनी हजरी लावली हे विशेष…*