*आमदार सुनील केदार यांच्या वक्तव्यामुळे भाजपात संताप*
*पोलीस अधिक्षकांना तक्रार*
*वेळ पडल्यास जश्यास तसे उत्तर देउ – डॉ राजीव पोतदार*
*जिल्हा प्रतिनिधी*
*नागपूर:सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा येथील स्टार बसच्या उदघाटन कार्यक्रम दरम्यान सावनेर क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी आपल्या कार्यकर्त्यासह कार्यक्रम स्थळी पोहचून उदघाटनाला आलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ राजीव पोतदार आणी ईतर भाजप नेत्यासोबत वाद घालत केदार यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत भाजप वर श्रेय लाटन्याचा आरोप केला तसेच काँग्रेस सरकार च्या काळात झालेली कामे आपण केल्याचा पाढा वाचत असल्याचा व या कार्यक्रमात स्थानीक आमदार व गावच्या सरपंच यांना बोलाविन्यात आले नाही यावरून निर्माण झालेल्या वादामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली.काँग्रेस कार्यकर्ते यांनी केलेल्या हौदसाचे प्रत्यूत्तर देण्यास भाजप कार्यकर्ते ही सरसरावल्या मुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला.त्यानंतर सुनील केदार यांनी भाजपचा झंडा घेऊण फीरणार्यांना घरात घुसुन मारु अशी वाच्यतेचे व्हिडिओ व्हायरल झाला.आमदारांच्या या धमकीवजा वक्तव्यामुळे संतप्त उपस्थित भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी सदर घटनेची माहिती मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना देऊण तसेच यासंदर्भात पोलीस अधिक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण यांच्याकडे तक्रार दाखल करून कारवाई ची मागणी केली आहे तसेच याबाबत आयोजीत पत्रपरिषदेत डॉ राजीव पोतदार यांनी आमदार केदारांची गुंडागर्दी खपवून घेणार नाही व वेळ भासल्यास आम्हीही जश्यास तसे सडतर उत्तर देऊ असा ईशारा दीला.*
*गुंडप्रवु्तीचे पाठराखे आमदार केदार*
*आमदार केदारांवर गुंडप्रवु्त्तीचे पाठराखे असल्याचा आरोप करीत आश्याच गुंडप्रवु्त्तीच्या कार्यकर्त्यांना पुढे करुण निवडनुकी पुर्वी दहशतीचे वातावरण निर्माण करतात.सिल्लेवाडा येथून स्टार बस सेवा सुरु व्हावी हा प्रस्ताव ग्राम पंचायत सदस्य अनिल तंबाखे यांचा होता.भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्याचा पाठपुरावा करुण सिल्लेवाडा ते नागपूर स्टार बस सुरु करण्यात यश मिळवले.सदर उदघाटन सोहळ्याला सरपंच प्रमिला बागडे यांना आमंत्रीत केले होते परंतू त्या आल्या नाही व केदार समर्थकांनी बसची सजावट तोडत कार्यक्रम स्थळी दहशत निर्माणकरुण शिवीगाळ केली.यापुर्वी ही विधानसभा निवडणूकीत भाजप चे उमेदवार आशीष देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.मागील निवडणूकीत भाजपच्या उम्मेदवाराचे उम्मेदवारी रद्द करण्यात तत्कालीन सत्तेचा वापर केला.त्यांच्या विरोधात अनेक प्रकरणे दाखल असुन भाजप व भाजप कार्यकर्ते त्याच्या कोर्या धमक्यांना भीत नाही व त्यांनी दिलेल्या भाजपचा झंडा घेऊण फीरणार्यांना घरात घुसुन मारु या विधानाचे प्रत्युत्तर म्हणून सिल्लेवाडा सह तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते आप आपल्या घरावर भाजपचा झंडा फडकवनार आहे असे कणखर मत पत्रपरीषदेत मांडले. पत्रपरिषदेस जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष रमेश मानकर,वरिष्ठ भाजष नेते संजय टेकाडे,सोनबा मुसळे,अशोक तांदुळकर,देवीदास मदनकर आदी उपस्थित होते.*