*४ जानेवारीला वीज व विदर्भ मार्च चे उर्जा मंत्री नितिन राऊत यांचा घरावर घेराव*

*४ जानेवारीला वीज व विदर्भ मार्च चे उर्जा मंत्री नितिन राऊत यांचा घरावर घेराव*

 नरखेड प्रतिनिधि श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – नरखेड आणि काटोल तालुक्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सभा. नरखेड आणि काटोल तालुक्यातील मसली, तिनखेडा, नरखेड आणि सावरगाव येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या सभा दिनांक ०१ जानेवारी २०२१ ला पार पडल्या. विदर्भातील जनतेचे कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे , २०० युनिटपर्यंत वीज फ्री करा , त्यानंतरचे वीज दर निम्मे करा, शेतीपंपाला वीज बिलातून मुक्त करा , उद्धव सरकारने अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई साठी शेतकऱ्यांचे १० हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते त्यात ९९९३ कोटी पच्छिम महाराष्ट्राला दिले तर फक्त ७ कोटी विदर्भाच्या शेतकर्यांना देवून ठाकरे सरकारने विदर्भद्रोह व विदर्भ विरोध दाखवून दिला आहे .याचा आम्ही निषेध करतो व विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये प्रती हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून ४ जानेवारी २०२१ ला संविधान चौक,नागपूर येथून दु.१२ वा. “ वीज व विदर्भ मार्च “ निघेल. ५ कि.मी हा मार्च ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या घराला घेराव घालेल व त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन होईल.

या आंदोलनासाठी संपूर्ण विदर्भातील ११ हि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वीजग्राहक, शेतकरी, तरुण, महिला सामील होणार आहेत. त्यासाठी संपूर्ण विदर्भभर बैठका, सभा, सम्मेलन होत असून जनजागृती करण्यात येत आहे.
७५ टक्के विदर्भात वीज उत्पादन करताना जमीन, पाणी, कोळसा, संपत्ती विर्भाची लागली वरून प्रदुशनही विदर्भालाच म्हणून या विजेवर विदर्भाच्याच जनतेचा अधिकार आहे. म्हणून विदर्भातील जनतेला २०० युनिटपर्यंत वीज फ्री द्या, त्यानंतरचे वीज दर निम्मे करा व शेती पंपाला वीज मुक्त करा हि आमची मागणी आहे. ३० हजार कोटी रूपाये फिटेपर्यंत व कोरोना काळातील वीज
बिल सरकारने भरेपर्यंत विदर्भातील सर्व जनतेचे वीज बिल भरूच नये, वीज कनेक्शन कापण्याचा विरोध करा, वीज कनेक्शन विरोध करा, लाईन कापली तर जोडून घ्या. वीज व विदर्भाच्या आंदोलनात सामील होण्यास ४ जानेवारीला हजारोच्या संख्येत घरून निघा व वीज मार्च यशस्वी करा असे आवाहन मा.राम नेवले यांनी केले. यावेळी रंजना मामर्डे, सुनील वडस्कर, वृषभ वानखेडे , संजय उपासे, बाबाराव वाघमारे, धीरज मांदळे, प्रविन राऊत , श्रीकांत डफरे, प्रशांत तागडे, निलेश पेठे, चेतन उमाठे, धनराज तुमडाम, गिरीष शेंडे, उमराव पाटील, अजाबराव पाटील, मनीष नाकाडे, पंकज लोलुसरे, पुरुषोत्तम हेलोंडे, भाऊराव नासरे, रामदास नासरे, तूळशिराम सिरसागर, दिनकर बारई, रामराव गौरखेडे, तुषार कुर्हाडे, संकेत कुर्हाडे, हेमंत मेंडोलिया, सुनील रेवतकर, विजयराव गान, रामचंद्रजी काळबांडे, वासुदेव दुधकवळे, प्रदीप.बोंद्रे, यांच्यासह अनेक विदर्भवादी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …