*इंडियन मेडिकल असोसीयेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत* *डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त* *या प्रसंगी वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय धोटे यांची इंडियन अकाँडमी आँफ पीडियाट्रिक जिल्हा नागपुर अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल सत्कार*

*इंडियन मेडिकल असोसीयेशन ची नवीन कार्यकारिणी गठीत*

*डॉ. निलेश कुंभारे अध्यक्ष तर डॉ. परेश झोपे सचिव नियुक्त*

 

 

*या प्रसंगी वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय धोटे यांची इंडियन अकाँडमी आँफ पीडियाट्रिक जिल्हा नागपुर अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल सत्कार*

मुख्य संपादक – किशोर ढुंढेले
सावनेरः चिकित्सा क्षेत्राच्या उत्थानाकरीता कर्यरत असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सावनेर शाखेची नवीन कार्यकारणीची निवड नुकतीच आएमए हाँल सावनेर येथे पार पडली त्यात असोसिएशनच्या पुढील वाटचालीकरिता अध्यक्ष बालरोगतज्ज्ञ डॉ निलेश कुंभारे,उपाध्यक्ष डॉ. आशीष चांडक,डॉ. उमेश जिवतोडे,सचिव परेश झोपे,सह सचिव डॉ.विलास मानकर,कोषाध्यक्ष डॉ.शिवम् पुण्यानी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर डॉ. विजय धोटे,डॉ. चंद्रकांत मानकर,डॉ. स्मिता भुडे,डॉ. अमित भाटी,डॉ. प्रविण चव्हाण यांना आमंत्रित सदस्य म्हणून नवनियुक्त कार्यकारणीत मान देण्यात आला.

इंडियन मेडिकल असोसिएशन सावनेर च्या वतिने अनेक लोकाभिमुख आयोजने करुण क्षेत्रातील नागरिकांना योग्य आरोग्य व्यवस्था उपलब्ध करुण देण्याकरिता ही संघटना नेहमीच पुढाकाराने कार्य करत असते याचे उदाहरण मावळते अध्यक्ष डॉ.प्रविण वाकोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोना काळात केलेले भरीव कार्य आहे. संपूर्ण देशाला सळो की पळो करुण सोडणार्या कोवीड़19 विषाणूंचा प्रादुर्भावात अनेक जनजागृती चे आयोजन करुण करुण आपली सामाजिक बांधिलकी जोपासनारी संस्था म्हणून पुढाकार घेत शासनाच्या कांद्याला कांधा देण्यात पुढाकर घेतला होता हे विशेष.

इंडियन मेडिकल असोसिएशनची आपल्या सावनेर शहरात शाखा असावी व त्यातून चिकित्सा क्षेत्रात व्यवसाय करणार्या चिकित्सकांना उदभवणार्या अडी-अडचणी तसेच आपल्या हातून सामुहीक रित्या समाजकार्य घडावे या हेतुने नगरीतील वरिष्ठ चिकित्सक डॉ. जयंत कुळकर्णी, डॉ. विजय धोटे,डॉ. अशोक घटे,डॉ. विजय घटे, डॉ. रवींद्र नाकाडे,डॉ. विनोद बोकडे आदिंनी 20 वर्षा आधी पुढाकार घेत सावनेर शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनची शाखा स्थापन करुण मागील विस वर्षापासून चिकित्सक क्षेत्रात असुनही सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.


नुकत्याच पार पडलेल्या सर्वसंमतीने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थेतील सर्व सदस्यांनी पुढील वाटचाली करिता शुभेच्छां देत मवळत्या पदाधिकाऱ्यांनी पदभार सोपवला.

 

*डॉ. विजय धोटे नागपुर जिल्हा इंडियन अकाँडमी आँफ पेडियाट्रिकचे अध्यक्ष पदावर नियुक्ती बद्दल सत्कार*

याप्रसंगी नुकत्याच पार पडलेल्या इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक नागपूर च्या निवडणुकीत डॉक्टर विजय धोटे अध्यक्ष नेमण्यात आले डॉक्टर निलेश कुंभारे व डॉक्टर आशिष चांडक आमंत्रित सदस्य म्हणून नेमण्यात आले सावनेर शहरातील वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय धोटे यांची नागपुर जिल्ह्यातील एक हजाराच्यावर सदस्य असलेल्या इंडियन अकँडमीक आँफ पेडियाट्रिक अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल आयएमए सावनेर चे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी शाल श्रीफळ देऊण सत्कार करण्यात आला तर सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊण शुभेच्छा दील्या या प्रसंगी डॉ. नितीन पोटोडे,डॉ. अमीत बाहेती सह संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते.

*याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त नवनियुक्त अध्यक्ष डॉ निलेश कुंभारे यांनी पुढील नियोजनाबात विचार मांडत म्हटले की आगामी काही दिवसात कोवीड़ रुग्णाकरीता प्लाझ्मा तपासणी व डोनेशन कँम्प आयोजीत केले असुन जिल्हा अध्यक्ष डॉ. विजय धोटे यांनी म्हटले की यापदावर मी नागपुर जील्हा ग्रामीण मधुन निवड होणारा पहिलाच डाँक्टर असुन जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागात विविध आरोग्य विषयक आयोजन करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील असा विश्वास व्यक्त केला*

*सोबतच कोरोना संसर्ग काळात भरिव कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवांचा पुष्पगुच्छ देऊण सन्मान करण्यात आला*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …