*हिंगणघाट तालुक्यात आठ मोरांचा मृत्यू*
*मोरांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ*
*मृत्यू झालेल्या मोरांचा विसरा तपासणीसाठी पुण्याला रवाना*
*बर्ड फ्लू ने मृत्यू झाला असल्याची शक्यता आठ मोरांचा मृत्यू मध्ये एक नर.. तर सात मादी मोरांचा समावेश*
विशेष प्रतिनिधी वर्धा-हिंगणघाट
वर्धा – जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव (दातार) येथील शिवारात बुधवारी दुपारी आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळ दाखल झाले होते.मृत मोरांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार असून अहवाल आल्यावर त्यांचा मृत्यू कशाने हे स्पष्ट होईल.
बोरगाव (दातार) येथील नाल्याच्या बाजूला हे आठ मोर मृतावस्थेत आढळले.यामध्ये एक नर तर सात मादी असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय.सध्या राज्यात बर्ड फ्लूची साथ सुरू असल्याने घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोरांची पाहणी केली. मृत मोरांपैकी पक्ष्याचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहे. पुण्यात तपासणीनंतर मोरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या बर्ड फ्ल्यूची साथ सुरू आहे. अशात आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहेय. वनविभागाच्या वतीनं पुढील कारवाई केली जात आहे.