*सुनील केदार यांच्यावरील आरोप बिनबुडाचे…*
*युवक कार्यकर्त्यांचे ठिक-ठिकाणी निदर्शने*
*मुख्य संपादक – किशोर ढुंढेले सावनेर*
*सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या उद्घाटनावरुण उद्भवलेल्या वादात आमदार सुनील केदार यांच्यावर करण्यात आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत.*
*नागपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण चे उपाध्यक्ष प्रकाश वसु आणि महिला अध्यक्ष तक्षशिला वाघधरे यांनी पत्रपरिषदेत केला.दि ०१ आगस्ट २०१९ रोजी. सिल्लेवाडा ग्रामपंचायतच्या मासिक सभेत. सिल्लेवाडा ते सिताबर्डी अशी बस सेवा सुरु करण्यात यावी. असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. हा ठराव म.न.पा.च्या परिवहन विभागाकडे पाठविण्यात आला. आमदार केदार यांनी. सातत्याने पाठपुरावा केल्याने हि बससेवा सुरू करण्यात आली. सिल्लेवाडाच्या सरपंच प्रमिला बागडे यांनी बस सेवेचे उद्घाटन करण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र भाजपाच्या काही नेत्यांनी हे श्रेय लेटण्यासाठी आधिच बसचे उद्घाटन केले.या कार्यक्रमात सरपंच बागडे यांना आंमत्रीत केले नव्हते.*
*शासकीय परिपत्रकानुसार कुठल्याही कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक लोकप्रतिनिधीना देणे आवश्यक आहे.मात्र सरपंच बागडे यांना डावलून बससेवेचे उद्घाटन करण्यात आले.यामुळे एका महिला लोकप्रतिनिधीचा अपमान झाला आहे.यावेळी आमदार यांनी केलेल्या भाषणाचा विषयास करुन अर्थ काढण्यात आला.पत्रपरिषदेला उपस्थित प्रमिला बागडे, रविंद्र चिखले ,वंदना ढगे, लईक अंसारी पुरुषोत्तम चांदेकर.आदि उपस्थित होते*
*धापेवाडा सह तालुक्यात अनेक ठिकाणी युवक काँग्रेस चे निर्दशन*
*सिल्लेवाडा स्टार बस शुभारंभ प्रसंगी उदभवलेल्या प्रकाराचे पडसाद संपूर्ण सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात उमटू लागले आहे सावनेर कळमेश्वर तालुक्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकत्यांचे निषेध करवायास सुरुवात केले असुन आज नागपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल सीरीयाँ,सावनेर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांच्या अध्यक्षतेत धापेवाडा सह अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते यांनी सील्लेवाडा येथ केलेल्या कु्त्याचा निषेध नोंदवित आंदोलनात्मात पाऊल उचलन्याचा ईशारा दीला.याप्रसंगी धापेवाडा शहर अध्यक्ष प्रवीण ठाकरे, अमोल केने, विष्णु कोकड़े, मनीष धोटे,रोशन कोहड़े, राजेश शेटे, योगेश ठाकरे, अभिजीत वाड़के, शाहिद महाजन, विक्की निम्बालकर, मोहित वाड़के, विनोद वानखेड़े, महेश भोयर, नीलेश तिड़के, वैभव वाघ, विलास ठाकरे, संजय कोहड़े, पवन सावरकर, युवराज पारसे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.*
*निवडणूक पुर्वी आरोप प्रत्यारोपाचे पर्व रंगत असुन याचे रुपांतर आता पोलीस तक्रारीत होण्यास सुरुवात झाली आहे हे बधात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकी तापट वातावरणात व चुरसीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.*