*प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे कोरोना लसीकरणाची सुरुवात*
*पहिल्या चरणात आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तर पुढील चरणात आंगनवाडी सेवीका,महसूल विभाग,इतर कर्मचारी व 50 वर्षापेक्षा जास्त असे प्राथमिक नियोजन*
सावनेर प्रतिनिधी – रवी काळबांडे सोबत दिनेश चौरसिया
सावनेरः कोरोना महामारीवर उपायोजना म्हणून केन्द्र सरकार व राज्य शासनाने कोवीड़ 19 लसिकरणास देशभरात लसीकरणास येत्या 16 जानेवारी पासुन सुरुवात झाली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशस्तरावर याची सुरुवात केली असुन सदर लसीकरणाच्या पहिल्या चरणाची सुरुवात प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,प्रभारी तहसीलदार चैताली दराडे,पंचायत समिती सावनेरचे गट विकास अधिकारी अनिल नागने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत वाघ,डॉ भुषण सेंबेकर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.16 जानेवारीला 100 आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली*
*कोवीड़19 लसीकरण मोहिमेचे हे पहिले चरण असुन संपूर्ण जिल्ह्यातील 13 आरोग्य केन्द्रावरुन सुटीचे दिवस वगळता दररोज 100 आरोग्य अधिकारी, कर्मचारी,आरोग्य सेवक,आंगनवाडी सेवीका,महसूल विभाग व पन्नास वर्षावरील संशयीतांना आँनलाईन पध्दतीने लसीकरण करण्यात येणार असुन पुढील चरणाची सुरुवात केन्द्र व राज्य शासनाच्या दिशानिर्देशावरुण होण्याची शक्यता आहे*
*लसिकरणाच्या सुरुवातीला पहली लस सावनेर तालुका सहाय्यक आरोग्य अधिकारी मधुकर सोनुने यांना आरोग्य सेवीका प्रतिभा लांजेवार यांनी दीली. लसिकरणापुर्वी व नंतर मधुकर सोनुने यांच्याशी लस टोचुन घेण्याबाबत काही भीती अथवा शंका असल्याबाबत वीचारणा केली असता त्यांनी म्हटले की कोवीड़ 19 संसर्गाच्या सुरवाती पासुनच आम्ही सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी आपल्या सेवा देत आहोत व तालुक्यातून पहली लस टोचून घेण्याचा मान मला मिळत आहे त्याबद्दल मनात कोणत्याही प्रकारची शंका कुशंका नसुन हा माझ्याकरता आनंदाच क्षण आहे असे मत व्यक्त केले*
*याप्रसंगी जिल्हा स्तरिय पर्यवेक्षक स्नेहल मेन्ढे,डॉ. भुषण सेंम्बेकर,डॉ. प्रितम निचट,तालुका सहा.आरोग्य अधिकारी मधुकर सोनुने,डॉ. ईसरत,डॉ. शुभ्रा,श्रीमती ऐटे,प्रामुख्याने उपस्थित होते*
*तर सदर कोवीड़ 19 लसीकरण मोहीमेच्या यशस्वीते करिता आरोग्य विभागाचे कर्मचारी गुणवंत ठाकरे,प्रणय कोरडे,घनश्याम तुर्के,प्रकाश धोटे,योगीता लांजेवार, मंजुषा भगतवार,प्रतिभा लांजेवार आदिना नियुक्त करण्यात आले आहे