*राज्यपालना शेतकरी यांच्या समस्याचे निवेदन*
नरखेड तालुका प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नागपुर / नरखेड़- भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने माननीय राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या विषयी चर्चा करण्यात आली व समस्याचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित मा .कृषीमंत्री अनिल बोंडे, यांच्या नेतृत्वात निवेदन दिले सोयाबीन संत्रा मोसंबी या पिकांची नुकसान भरपाई व कापुस या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आज पर्यंत सर्वेक्षण व पंचनामे झाले नाही .या वर्षीचे साल नापिकीचे असुन सुध्दा आणेवारी हि पन्नास टक्क्या पेक्षा जास्ता दाखवण्यात आली .त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास अडचण जाईल व पिक विमा पण भेटणार नाही. शासनांनी जाहीर केल्या प्रमाणे नियमित कर्ज भरण्याऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्सानपर पन्नास हजार रू अनुदान मिळाले नाही .या सर्व अडचणी आपण दखल घेवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आनंदराव राऊत, ललित संदुरकर , संदीप सरोदे भा.ज.पा किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष कपिल आदमने व उपस्थित होते.