*कन्हान येथे निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन*
कन्हान प्रतिनिधि-ऋषभ बावनकर
कन्हान – अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण कार्याला सुरवात झाली असुन सर्व भारतीयांच्या सहभागाने हे भव्य श्रीराम साकारणार असुन व देशात निधी संकलन सुरु झाले असुन कन्हान येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व गृहसंपर्क अभियान समिती कन्हान च्या वतीने तारसा रोड चौक कन्हान येथे श्रीरामचंन्द्र प्रतिमेचे पुजन करुन तसेच भव्य महाआरती करुन , व बुंदी वाटप करुन निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले .
शुक्रवार दिनांक १६ जानेवारी ला श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण व गृहसंपर्क अभियान समिती कन्हान च्या वतीने कन्हान तारसा चौक येथे भव्य महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रभु श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असता या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून ग्रीनर फाउंडेशन नागपूर चे संस्थापक अध्यक्ष श्री सचिनजी नायडू , प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत बौद्धिक प्रमुख मास्तर श्री उल्हासजी इटनकर , व या प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अभियान प्रमुख विश्व हिंदू परिषदेचे राजेशजी पिल्ले प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्यांनी कार सेवेत अयोध्याला जाऊन आपले विशेष योगदान श्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात दिले होते अश्या कार सेवकांन मध्ये श्री योगेशजी वाडीभस्मे, श्री अविनाश जी कांबळे , स्वर्गीय ज्ञानेश्वरजी पुंड (पुत्र सुहासजी पुंड) , स्वर्गीय संजयजी पवार (पुत्र उज्वलजी पवार) श्री.खंदारेजी , श्री.राजेंद्रजी बेले यांचा भगवा दुपट्टा घालून सत्कार करण्यात आला असुन कार्यक्रमात उपस्थित जनसमूहास अयोध्येत साकार होणाऱ्या भव्य दिव्य अशा प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर बांधकामाकरिता घराघरातून आर्थिक रुपाने मदत संपूर्ण देशाच्या माध्यमातून व्हावी असे आव्हाहन प्रमुख वक्त्यांनी आपल्या तेजस्वी भाषणातून नागरिकांना केले .कार्यक्रमात निधी समर्पणाचा एक भाग म्हणून स्वर्गीय अंकित दिवटे यांचे स्मृतीप्रित्यर्थ श्री.रामभाऊ जी दिवटे यांनी प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर बांधकामाकरिता एकूण 11,000 रुपयाचा चा धनादेश समितीच्या प्रमुखांकडे सुपूर्द केला . त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी भव्य महाआरतीत प्रभू श्रीराम मंदिर निर्माण गीत, हनुमान चालीसाचे पाठ करून , व प्रभू श्रीरामांची भव्य महाआरती करुन सर्वांना प्रसाद म्हणुन बुंदी वाटप करुन निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमात कन्हान – पिपरी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे , माजी उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक, नप विरोधी पक्ष नेते राजेंद्र शेंद्रे , रामभाऊ दिवटे , जयराम मेहरकुळे , हिरालाल गुप्तता , मूलचंदजी शिंदेंकर ,अमिश रुंघे , लीलाधर बर्वे , प्रदीप बावने , प्रवीण माने , सरीता लसुंते नगरसेवक सुषमा चोपकर , वंदना कुरडकर ,वर्षा लोंढे सह मोठ्या संख्येत श्रीराम भक्त या कार्यक्रमात उपस्थित होते . कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता संजय चोपकर ,संजय रंगारी ,रिंकेश चवरे ,शैलेश शेळके ,अमोल साकोरे ,रानु शाही ,गुरुदेव चकोले ,पऱ्याग पोटभरे , दिनेश खाडे , किरण चकोले ,ऋषभ बावनकर , विनोद कोहळे , रिक्कु सिंह ,बाडूलेजी ,जयंता कोतपल्लीवार ,बीरेश गुप्ता ,स्वाती पाठक , सुषमा मस्के , शालिनी बर्वे , निलिनी पोटभरे सह आदी ने सहकार्य केले .कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौरभ पोटभरे यांनी केले तर आभार अतुल हजारे यांनी व्यक केले.