* लतामंगेशकर हास्पीटल तर्फे आरोग्य सेवा नोकर भर्ती पुर्व प्रशिक्षण निशुःल्क देण्यात येणार!* –डॉ. आषिश देशमुख
काटोल प्रतिनिधि- दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील भरती संदर्भातील मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून लवकरच एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पदांची भरतीची जाहिरात उद्याच प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती माजी आमदार डाक्टर आषिश देशमुख यांनी मंगळवार १९ जानेवारीला आपल्या काटोल येथील निवास स्थानी आयोजीत पत्रकार परिषदे मधे दिली आहे. त्यांनी सांगितले की लवकरच (एक -दोन दिवसाततच)नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होऊ शकते अस्सी डाक्टर आषिश देशमुख यांनी या वेळी सांगितले .
“कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला होता. आरोग्य यंत्रणेवरील सध्याचा ताण लक्षात घेता येत्या काळात एकूण १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे”, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे म्हणने आहे ।
आरोग्य सेवा नोकर भरती पुर्व निशुःल्क प्रशिक्षण – डॉ.आशीष देशमुख
आरोग्य सेवेसाठी लागनारे कर्मचारी यांना नोकर भरती पुर्व निशुःल्क प्रशिक्षण लतामंगेशकर हाॅस्पिटल डिगडोह येथील आरोग्य सेवेतील प्रशिक्षित अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांचे मार्फत देण्यात येणार असल्याची माहीती डाक्टर आशिष देशमुख यांनी दिली । या प्रसंगी लता मंगेशकर हास्पीटल चे डिन काजल मित्रा, डाक्टर देव के, डाक्टर पल्लवी , डाक्टर हर्ष देशमुख, यांनी आरोग्य सेवा नोकर भर्ती पुर्व प्रशिक्षणात कोण कोणत्या विभागाशी संलग्न (नर्सेस, वार्ड बाॅय, क्लर्क, टेकनिशियन, औषधी निर्माण, व अन्य क व ड वर्गातील पद भरती चे ) पदांचे निशुक प्रशिक्षण दिले जाणार याबाबद माहिती दिली। तसेच कोंढाळी, काटोल, जलालखेडा, नरखेड, या ठिकाणी प्रशिक्षण केन्द्र असतील तसेच ऑनलाइन प्रशिक्षण देण्या बाबद ही विचार सुरु असल्याचे डाक्टर देशमुख म्हणाले
संस्थेचे संचालक दिनकरराव राऊत यांनी उपस्थित पत्रकारां चे आभार मानले.