*अवैध मोहाफुल गावठी हातभट्टी दारूच्या अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे धाड*
*सावनेर येथील ईटनगोटी शिवारातील घटना,1,87,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – तालुक्यातील इटनगोटी शिवारात सुरू असलेल्या अवैध मोहाफुल गावठी हातभट्टीच्या अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाडी टाकून केलेल्या कारवाईत एकूण 187800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना ताब्यात घेतले रवी रामचंद्र सहारे 52, संदीप मधुर धुर्वे 35 ,जितेंद्र तुकाराम राऊत 40 सर्व राहणार पाटणसावंगी असे आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी(ता.1) रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथक पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दूरक्षेत्र पाटणसांगी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस मित्राद्वारे पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत मौजा इटनगोटी शिवारात अवैधरीत्या मोहाफुल हातभट्टी सुरू असल्याचे खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने धाड टाकून घटनास्थळावरून एकूण 1200 लिटर मोहाफुल रसायन( सडवा) 300 लिटर मोहाफुल गावठी दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण 187800 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करून पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन सावनेर यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांचे मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार बाबा केचे, पोलीस हवालदार चंद्रशेखर गडेकर, निलेश बर्वे ,नापोशी राजेंद्र रेवतकर ,पोलीस शिपाई रोहन डाखोरे चालक पोलीस नायक अमोल कुथे यांनी पार पाडली.