*केद्र सरकार शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात आज सावनेरात चक्काजाम आंदोलन*
*शेतकरी शेतमजूर केन्द्र शासनाच्या विरोधात रस्त्यावर*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरसिया
सावनेर – केन्द्र शासनाने पारीत केलेल्या शेतकरी वीरोधी कायद्याच्या विरोधात काँग्रेस व अन्य शेतकरी प्रेमी संस्थांनी पुढाकार घेत दि.6 फेब्रुवारी 2021 रोजी क्षेत्राचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर कुंभारे उपाध्यक्ष जिल्हापरिषद नागपूर,सभापती पंचायत समीती सावनेर,पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत गांधी पुतळा चौक येथे रस्तारोको आंदोलन करुण केद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात तीव्र निदर्शने आयोजिले आहे.
आज दि.6 फेब्रुवारी ला सकाळी 11-00 वाजता गांधी पुतळा येथे होणार्या या रस्तारोको आंदोलनात सावनेर तालुक्यातील सर्व काँग्रेस,युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,शेतकरी व शेतमजूर बांधवांनी आपले ट्रँक्टर,बैलगाड्या व मिळेल त्या साधनाने दुपारी 11-00 वाजेपर्यंत मोठ्या संख्या ने पोहचावे अशी विनंती तालुका काँग्रेस अध्यक्ष सतिष लेकुरवाळे, सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे, शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल,युवा नेते मनोज बसवार, नगरसेवक सुनिल चाफेकर, निलेश पटे, यांनी केले आहे*